Lokmat Money > बिझनेस न्यूज > करकपातीने सरकारी कंपन्यांना १९,३०० कोटींचा होणार फायदा

करकपातीने सरकारी कंपन्यांना १९,३०० कोटींचा होणार फायदा

सरकारी कंपन्यांना अंदाजे १९,३०० कोटी कमी कर नफ्यावर भरावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:59 AM2019-09-25T02:59:16+5:302019-09-25T02:59:51+5:30

सरकारी कंपन्यांना अंदाजे १९,३०० कोटी कमी कर नफ्यावर भरावा लागणार

Tax deduction will benefit government companies at Rs 19,9 crore | करकपातीने सरकारी कंपन्यांना १९,३०० कोटींचा होणार फायदा

करकपातीने सरकारी कंपन्यांना १९,३०० कोटींचा होणार फायदा

मुंबई : कंपनी कराचा दर ३४.२० वरून २५.१० टक्के कमी झाल्याने सरकारी कंपन्यांना अंदाजे १९,३०० कोटी कमी कर नफ्यावर भरावा लागणार आहे, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. मजेची बाब म्हणजे, सरकारी कंपन्या जो लाभांश (डिव्हिडंड) सरकारला देतात, त्यापोटी केंद्र सरकारला या वर्षी १०,००० कोटी परत मिळतील, असेही या सर्वेक्षणात उघड झाले.

काही प्रमुख कंपन्यांची कर बचत अशी असेल (रु. कोटी)
आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) - ७,०९५
कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) - २,८३५
इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लि. (आयओसीएल) - २,१२७
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) - १,१२९
गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लि. (जीएआयएल) - ८०४
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पो. (एनएमडीसी) - ७४६
नेव्हेली लिग्नाईट कॉर्पो. (एनएलसी) - ६७८
नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पो. (एनएचपीसी) - ४८९
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) - ४३७
भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (बीएचईएल) - ३७५
नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी (एनएएलसीओ) - ३१८
स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एसएआयएल) - ३०७
आॅईल इंडिया लि. (ओआयएल) - २६२
मँगलोर रिफायनरीज अँड पेट्रोकेमिकल्स (एमआरपीएल) - १३६
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (बीईएल) - ११९

Web Title: Tax deduction will benefit government companies at Rs 19,9 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर