Join us

कर निर्धारण - एक जोखीम

By admin | Published: January 29, 2017 11:29 PM

वस्तू आणि सेवांवरील कर’ हा ‘द्वयी’ (ऊ४ं’) आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्य दोघांनाही कर लावण्याची व गोळा करण्याची मुभा/हक्क आहे

जीएसटीकरण - भाग ११अ‍ॅड. विद्याधर आपटेवस्तू आणि सेवांवरील कर’ हा ‘द्वयी’ (DUEL) आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्य दोघांनाही कर लावण्याची व गोळा करण्याची मुभा/हक्क आहे. त्यामुळेच करभरणा झाल्यानंतर थोडक्यात करसंकलन झाल्यानंतर कर वितरण / संयोजन हे ‘वस्तू आणि सेवांवरील कर परिषद’ जसे ठरवेल तसे होईल. ढोबळपणे आयजीएसटी आणि सीजीएसटी यातून मिळणारे करउत्पन्न केंद्र सरकारच्या तिजोरीत थेट पोहोचेल आणि एसजीएसटीमधून मिळणारे उत्पन्न ज्या राज्यात वस्तू आणि / किंवा सेवा पुरवठा झाला आहे, त्या राज्याच्या तिजोरीत थेट जमा होईल. आयात वस्तू किंवा सेवांवर लावण्यात येणाऱ्या आयजीएसटी व एसजीएसटीसाठीची कर रक्कम ज्या राज्यातील करपात्र व्यक्तीसाठी वस्तू अथवा सेवा आयात केली आहे त्या राज्याला मिळेल.कर निर्धारण एक जोखमीचे काम असावे. कारण प्रत्येक करपात्र व्यक्ती आपल्या महिन्याभराच्या उलाढालीचा लेखाजोखा ‘विवरणपत्र’ रिटर्न स्वरूपात सरकारला सादर करणार आहे. त्यासाठी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे ‘सामाईक ई-नोंदी’ व्यासपीठ जीएसटीएन कंपनीने तयार केले आहे.जेथे प्रत्येक गटासाठी (करपात्र व्यक्ती सापेक्ष) वेगवेगळे विवरणपत्र तयार केले आहे. त्यातील विवरणपत्र - १ (जीएसटीआर-१) आणि विवरणपत्र - २ (जीएसटीआर-२) म्हणजे वस्तू आणि सेवा पुरवलेल्याच्या नोंदी आणि वस्तू आणि सेवा घेतलेल्याच्या नोंदींपुरते मर्यादित जरी असले, तरी सदर विवरणपत्रातील नोंदी महिनाभर जसजसे व्यवहार होतील, तसतसे नोंदवले तरी चालणार आहे. विवरणपत्र ३ (जीएसटीआर-३) मात्र करदायित्वबद्दल असल्याने जोपर्यंत करभरणा होत नाही, तोपर्यंत भरता येणार नाही.

va3gst@gmail.com