Join us

सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 4:49 PM

Tax Devolution To States: कोणत्या राज्याला किती रक्कम मिळाली? पाहा...

Tax Devolution To States: वर्षातील सर्वात मोठा सण, म्हणजेच दिवळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने राज्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्राने दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूर्वीच राज्य सरकारला कर वाटप म्हणून 1,78,173 कोटी रुपये जारी केले आहेत. त्यापैकी 89,086 कोटी रुपये सणांच्या पार्श्वभूमीवर आगाऊ म्हणून जारी केले आहेत.

राज्यांना आगाऊ हफ्ता दिलाअर्थ मंत्रालयाने प्रेस रिलीजमध्ये सांगितले की, 10 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने राज्यांना कर वाटप म्हणून 1.78,173 कोटी रुपये जारी केले आहेत. साधारणपणे मासिक कर वाटप 89,086.50 कोटी रुपये असते. परंतु सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारे भांडवली खर्चाला गती देऊ शकतील आणि विविध योजनांवरील खर्चासाठी राज्यांना कर वितरणाचा आगाऊ हप्ता देण्यात आला आहे.

कोणत्या राज्याला किती कर वाटप?अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1,78,173 कोटी रुपयांच्या कर महसूलापैकी सर्वात मोठी रक्कम उत्तर प्रदेशला देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशला 31,962 कोटी रुपये, बिहारला 17,921 कोटी रुपये, मध्य प्रदेशला 13,987 कोटी रुपये, पश्चिम बंगालला 13,404 कोटी रुपये, महाराष्ट्राला 11,255 कोटी रुपये, राजस्थानला 10,737 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याशिवाय तामिळनाडूला 7,268 कोटी रुपये, ओडिशाला 8068 कोटी रुपये, कर्नाटकला 6498 कोटी रुपये, आंध्र प्रदेशला 7211 कोटी रुपये आणि पंजाबला 3220 कोटी रुपये, छत्तीसगडला 6070 कोटी रुपये, झारखंडला 59892 कोटी रुपये, गुजरातला 6197 कोटी रुपये, आसामला 5573 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

टॅग्स :केंद्र सरकारनरेंद्र मोदीइन्कम टॅक्स