नवी दिल्ली : बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच श्रीमंतांच्या करचुकवेगिरीमुळे देशाचे दरवर्षी १० अब्ज डाॅलर्स एवढे नुकसान हेत असल्याचा निष्कर्ष ‘द टॅक्स जस्टीस नेटवर्क’ या संस्थेने एका अभ्यासातून काढला आहे.
अनेक देशांना करचुकवेगिरीचा फटका बसत असून, अनेक देशांचे मिळून ४२७ अब्ज डाॅलर्स एवढे नुकसान दरवर्षी हाेत आहे. अब्जावधी रुपयांचा नफा या बहुराष्ट्रीय कंपन्या करसवलती देणाऱ्या देशांमध्ये नेतात. त्यामुळेही माेठे नुकसान हाेते, असे निरीक्षण नाेंदविण्यात आले आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसत आहे. (वृत्तसंस्था)