Lokmat Money > बिझनेस न्यूज > करबुडवेगिरीचा 11,520 कोटींचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत ११४ जणांना अटक

करबुडवेगिरीचा 11,520 कोटींचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत ११४ जणांना अटक

GST News : देशभरातील जीएसटी करबुडवेगिरीचा ११,५२० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असून, अशा १,२३० प्रकरणांत आतापर्यंत ११४ जणांना अटक करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 05:31 AM2020-12-10T05:31:32+5:302020-12-10T07:41:48+5:30

GST News : देशभरातील जीएसटी करबुडवेगिरीचा ११,५२० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असून, अशा १,२३० प्रकरणांत आतापर्यंत ११४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Tax evasion scam worth Rs 11,520 crore exposed, 114 arrested so far | करबुडवेगिरीचा 11,520 कोटींचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत ११४ जणांना अटक

करबुडवेगिरीचा 11,520 कोटींचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत ११४ जणांना अटक

नवी दिल्ली : देशभरातील जीएसटी करबुडवेगिरीचा ११,५२० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असून, अशा १,२३० प्रकरणांत आतापर्यंत ११४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची रक्कम ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात गोळा झालेल्या एकूण जीएसटीच्या १० टक्के आहे.

जीएसटी कर बुडविण्यासाठी  खोटी देयके तयार करण्यात  आली होती. त्यामुळे जीएसटी संकलनात मोठी तूट येत होती. या संदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष  अजितकुमार यांनी या विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले की, जीएसटी बुडविण्याचे प्रकार शोधून काढण्यासाठी गेल्या महिनाभरापासून शोधमोहीम सुरू आहे. 

जीएसटी नोंदणी करताना ओळख अनिवार्य 
जीएसटीच्या बुडविलेल्या ११,५२० कोटी रुपयांपैकी आतापर्यंत ३३६.६३ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे अद्याप आधार कार्ड किंवा आयकर भरणा केल्याची कागदपत्रे नसतील, अशा लोकांच्या नावांची जीएसटीसाठी नोंदणी करताना त्यांची ओळख नीट पटविणारी प्रक्रिया वापरावी, असे जीएसटी कौन्सिलच्या विधी समितीने म्हटले होते. 

बनावट व्यापाऱ्यांना वगळा
जीएसटी कौन्सिलच्या विधी समितीने सांगितले की, करबुडवेगिरीचे प्रकार टाळण्यासाठी नव्या करदात्यांची नोंदणी प्रक्रिया त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी जोडली जावी. ती ऑनलाइन व लाइव्ह फोटो वापरून व्हावी, तसेच बनावट व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीतून वगळण्यासाठी पावले उचलावीत.

Web Title: Tax evasion scam worth Rs 11,520 crore exposed, 114 arrested so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी