Join us  

Tax: बजेटपूर्वीच सर्वसामान्यांना बसला मोठा धक्का, ३१ डिसेंबरपासून वाढणार हा टॅक्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 5:33 PM

Tax: इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबत केंद्र सरकारचं आपलं वेगळं धोरण आहे. तर वेगवेगळ्या राज्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्हेईकलबाबत आपलं वेगळं धोरण अवलंबलेलं आहे.

सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्सवर खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले जात आहे. केंद्र सरकारपासून वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी सरकारं अधिकाधिक लोकांनी इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करावीत म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सब्सिडी ऑफर करत आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबत केंद्र सरकारचं आपलं वेगळं धोरण आहे. तर वेगवेगळ्या राज्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्हेईकलबाबत आपलं वेगळं धोरण अवलंबलेलं आहे. तामिळनाडूचीही स्वतंत्र अशी ईव्ही पॉलिसी आहे. त्यानुसार राज्यामध्ये सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्सच्या रोड टॅक्सवर सवलत दिली जाते. मात्र ही सवलत लवकरच संपुष्टात येऊ शकते. असे झाल्यास तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्स महाग होऊ शकतात. केंद्र सरकारकडून नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हे होऊ शकते.

Zeon चार्जिंगचे सहसंस्थापक आणि सीईओ कार्तिकेयन यांनी ट्विट केले की, तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्ससाठी टॅक्स सवलत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. जर ही सवलत वाढवली नाही. तर तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्स १५ टक्क्यांनी महागणार आहे. म्हणजेच ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्सची ऑनरोड किंमत वाढणार आहे. कारण त्यावर लागणाऱ्या रोड टॅक्सवर सवलत मिळणार नाही. लोकांना पूर्ण कर भरावा लागेल.

तामिळनाडू ईव्ही पॉलिसीनुसार, आता खासगी इलेट्रॉनिक पॉलिसीनुसार आतापर्यंत ५० ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक टू व्हिलर खरेदी करणाऱ्यांनाही रोड टॅक्समध्ये १०० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. त्यांच्या खरेदीवरही इतर काही लाभ मिळतात.  ही सवलत ३० डिसेंबरपर्यंत आहे. जर यापुढे वाढवलं गेलं नाही तर ईव्ही काही मर्यादेपर्यंत महागणे निश्चित आहे.  

टॅग्स :करभारततामिळनाडू