नवी दिल्ली : रोखे हस्तांतरणावरील रोखे व्यवहार कर (एसटीटी) चुकता केला नाही तरी प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्तावाप्रमाणे (आयपीओ) समभागातील (इक्विटी) प्रामाणिक गुंतवणूक आणि अतिरिक्त समभागावरील दीर्घावधीसाठी लाभांश करातून सूट देण्याचा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा (सीबीडीटी) प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे सीबीडीटीने यासंदर्भातील नियमाचा मसुदा अधिसूचित केला आहे. सीबीडीटीच्या या नवीन प्रस्तावित नियमामुळे एकूण गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तथापि, शेअर बाजाराबाहेर परस्पर संमतीने होणारा व्यवहार या तरतुदीतहत करपात्र होईल, या महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करण्यात आलेला नाही. कंपन्याकडून आपल्या कर्मचाऱ्यांना लाभांशांच्या रूपात म्हणून जारी केलेले जाणारे बक्षिसीदाखल समभागावरील भांडवली लाभ कराबाबतही सीबीडीटीने जारी केलेल्या मसुद्यात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सीबीडीटीने या मसुद्यावर सर्वसंबंधिताकडून अभिप्राय मागवले आहेत. कलम १० (८)शी संबंधित दुरुस्तीत काही मुद्द्यांचा विचार केला आहे; परंतु, दुसरे पोटकलम प्रामाणिक गुंतवणूकदारांसाठी जोखमीचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कलम १० (३८) दुरुस्तीमागच्या उद्देशानुसार सरकारने जारी केलेली अधिसूचना उत्कृष्ट आहे. अप्रामाणिक व्यवहारावरावर कर सूट मिळविण्याचा दाव्याबाबत याकडे लक्ष ठेवण्यात आले आहे, असे खेतान अॅण्ड कंपनीचे भागीदार संजय संघवी यांनी सांगितले.
शेअर बाजाराबाहेर परस्पर संमतीने गुंतवणूकदाराने शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास त्या गुंतवणूकदाराला या शेअर्सच्या विक्रीवर भांडवली लाभ करातून सुट मिळविण्याचा दावा करता येणार नाही, असे डेलॉइट हॅस्कीन अँड सेल्सचे राजेश गांधी यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रामाणिक गुंतवणूक करणाऱ्यांना कर सूट
अतिरिक्त समभागावरील दीर्घावधीसाठी लाभांश करातून सूट देण्याचा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा (सीबीडीटी) प्रस्ताव आहे.
By admin | Published: April 6, 2017 12:16 AM2017-04-06T00:16:59+5:302017-04-06T00:16:59+5:30