नवी दिल्ली : 1 एप्रिल 2021 पासून नव्या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सच्या अनेक नियमांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. काही नियमांपासून दिलासा मिळेल, तर काहींमध्ये अशा तरतुदी आहेत की, थोड्याशाही चुकीवर डबल टॅक्स भरावा लागेल. (tax income tax rule there will be a change in the 5 rules from april 1 it will also have an effect on your pocket)
आज आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्सशी संबंधित असेच नियम सांगणार आहोत, ज्याची तुम्हाला नवीन वर्षात काळजी घ्यावी लागेल.तसेच, यामुळे तुमच्या खिशावर होणारा परिणाम सुद्धा कमी होऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आयटीआरशी संबंधित नियम. आयटीआर दाखल न करणाऱ्यांसाठी सरकारने नियम अतिशय कठोर केले आहेत. याअंतर्गत त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागू शकतो.
आरटीआर न भरल्यामुळे दुप्पट टीडीस भरावा लागेल सरकारने इन्कम टॅक्स कायद्यात 'कलम 206 एबी'ला जोडले आहे. आता तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास 1 एप्रिल 2021 पासून तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावे लागले. नवीन नियमांनुसार, ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नाही केले, त्यांच्यावर टॅक्स कलेक्शन अॅक्ट सोर्स (टीसीएस) देखील जास्त लागू शकेल. नवीन नियमांनुसार, पीनल टीडीएस आणि टीसीएलचे दर 1 जुलै 2021 पासून 10-20 टक्के असतील. हे सहसा 5-10 टक्के असते.
ईपीएफमध्ये 2.5 लाखांपर्यंत गुंतवणूकच टॅक्स फ्री2021-22 च्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कडून मिळालेल्या व्याजावर टॅक्स जाहीर करण्यात आला आहे. संसदेत अर्थसंकल्प मंजूर होताच नवीन आर्थिक वर्षापासून एका आर्थिक वर्षात अडीच लाखांपर्यंतची ईपीएफमधील गुंतवणूक टॅक्स फ्री होईल. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला अतिरिक्त रकमेसाठी आपला विचार केला जाईल.
एलटीसी योजनेचा फायदानवीन आर्थिक वर्षात ट्रॅव्हल लीव्ह कन्सेशन (एलटीसी) कॅश व्हाउचर योजना लागू होईल. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या प्रवासी बंदीमुळे एलटीसी टॅक्स लाभ न मिळालेल्या कर्मचार्यांसाठी ही योजना सुरू केली गेली आहे.
प्री-फील्ड आयटीआर फॉर्ममुळे सोपे होईल आयटीआर फाईल करणेइंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर्संना (वैयक्तिक करदाते) आता 1 एप्रिल 2021 पासून प्री-फील्ड आयटीआर फॉर्म दिला जाणार आहे. कर्मचार्यांच्या सोयीसाठी आणि इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयटीआर फाईल करण्यापासून सूट अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2021 पासून 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयटीआर न भरण्याची सूट प्रस्तावित करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन किंवा मुदत ठेवींवरील व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही सूट देण्यात आली आहे. यासाठी ज्या बँकेत त्यांचे पेन्शन खाते असेल तेथे एफडी वगैरे असाव्यात.