Lokmat Money > बिझनेस न्यूज > जहाजनिर्मितीसाठी देणार कर सवलत

जहाजनिर्मितीसाठी देणार कर सवलत

देशात जहाजनिर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सगळ्या प्रकारच्या कच्च्या मालावर आणि जहाजांच्या सुट्या भागांवर उत्पादन आणि सीमा शुल्क सुटीसह अनेक कर प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

By admin | Published: November 26, 2015 10:15 PM2015-11-26T22:15:27+5:302015-11-26T22:15:27+5:30

देशात जहाजनिर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सगळ्या प्रकारच्या कच्च्या मालावर आणि जहाजांच्या सुट्या भागांवर उत्पादन आणि सीमा शुल्क सुटीसह अनेक कर प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Tax rebate for generation | जहाजनिर्मितीसाठी देणार कर सवलत

जहाजनिर्मितीसाठी देणार कर सवलत

नवी दिल्ली : देशात जहाजनिर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सगळ्या प्रकारच्या कच्च्या मालावर आणि जहाजांच्या सुट्या भागांवर उत्पादन आणि सीमा शुल्क सुटीसह अनेक कर प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकाऱ्याने निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार जहाज, व्हेसल्स, टग्ज आणि पुशर क्राफ्टस् आदींच्या निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या सगळ्या प्रकारचा कच्चा माल आणि सुट्या भागांना सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली जाईल. याशिवाय निर्यातोन्मुखी संस्थादेखील कच्चा माल व सुट्या भागांवर सूट मिळण्यास पात्र असतील. सरकारने सीमा शुल्क अधिनियम १९६२ मधील कलम ६५ च्या तरतुदीला काढून टाकले आहे. यानुसार सीमा शुल्क विभागांतर्गत येणाऱ्या कोणत्याही गोदामात मोडणारी जहाजे आणि पुशर क्राफ्टस्ला सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्कातून सुटीचा लाभ मिळू शकेल.

Web Title: Tax rebate for generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.