Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीत कुणाकडूनही भेटवस्तू स्वीकारण्याआधी Income Tax चे नियम माहितीय का? कुठे लागतो कर?

दिवाळीत कुणाकडूनही भेटवस्तू स्वीकारण्याआधी Income Tax चे नियम माहितीय का? कुठे लागतो कर?

Tax Rules : दिवाळीत तुम्हाला नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटवस्तू मिळणार असेल तर टॅक्सबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:49 PM2024-10-18T13:49:22+5:302024-10-18T13:50:03+5:30

Tax Rules : दिवाळीत तुम्हाला नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटवस्तू मिळणार असेल तर टॅक्सबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

tax rules on which gifts you may have to pay income tax and which gifts are tax free | दिवाळीत कुणाकडूनही भेटवस्तू स्वीकारण्याआधी Income Tax चे नियम माहितीय का? कुठे लागतो कर?

दिवाळीत कुणाकडूनही भेटवस्तू स्वीकारण्याआधी Income Tax चे नियम माहितीय का? कुठे लागतो कर?

Income Tax Rules on Gifts: दिवाळीत पाडवा, भाऊबीज अशा अनेक मुहूर्तांवर आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो. या सणासुदीतही तुमच्यातही अशा भेटवस्तूंची देवणाघेवाण होईल यात शंका नाही. मात्र, या भेटवस्तूंवर लागू होणारे टॅक्सचे नियम माहिती आहे का? तुम्हाला कोणती भेटवस्तू दिली? त्याची किंमत किती आहे? यावरुन टॅक्समध्ये येईल की नाही? हे अवलंबून आहे. बहुतेक लोकांना भेटवस्तूंवर लागू होणाऱ्या आयकर नियमांची माहिती नसते.

या भेटवस्तू करपात्र उत्पन्नात गणल्या जातात
तुमचे मित्र किंवा ओळखीचे किंवा तुमचे रक्ताचे नाते नसलेली कोणतीही व्यक्ती तुम्हाला भेटवस्तू देत असेल तर त्यांच्या भेटवस्तू कराच्या कक्षेत येतात. वास्तविक, प्रत्येक भेटवस्तूवर कर आकारला जात नाही. तुमच्या मित्राने किंवा ओळखीच्या व्यक्तीने तुम्हाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख किंवा जमीन किंवा घर, शेअर्स, दागिने, पेंटिंग, पुतळा इत्यादी भेटवस्तू दिल्यास ते करपात्र उत्पन्न म्हणून गणले जाते. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ही माहिती देणे आवश्यक आहे. जर तुमचे उत्पन्न जास्त होत असेल तर यावर कर भरावा लागतो.

या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही
तुमचे सख्खे नातेवाईक आणि जवळचे नातेवाईक भेटवस्तू देत असतील तर त्यांच्यावर कोणताही कर नाही. यामध्ये मातृ आणि पितृक सर्व नातेवाईकांचा यात समावेश आहे. जर यापैकी कोणीही तुम्हाला भेटवस्तू दिली तर ते कराच्या कक्षेत येत नाही. त्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असली तरीही.

हे नियम नीट समजून घ्या

  • पती-पत्नीमधील भेटवस्तूंच्या व्यवहारांवर कोणताही कर नाही. कारण भेटवस्तूंच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न इनकम क्लबिंगच्या कक्षेत येते.
  • नातेवाइकांकडून मालमत्ता, शेअर्स, बाँड, वाहने इत्यादी मिळाल्या असतील तर ते करमुक्त आहेत, मित्रांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून मिळाल्यास ते करपात्र आहेत.
  • लग्नात मिळालेली भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त असते, तर मालकाकडून मिळालेली भेट कराच्या कक्षेत येते.
  • मित्रांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून वर्षभरात ५० हजार रुपयांपर्यंतची भेटवस्तू मिळाल्यास ती करमुक्त आहे, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असल्यास कर भरावा लागतो.
  • जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या मालमत्तेवर कोणतेही कर आकारला जात नाही. परंतु, त्या मालमत्तेच्या विक्रीवर कर भरावा लागतो. 
  • मृत्युपत्रात मिळालेल्या मालमत्तेवर कोणताही कर नाही. मात्र, ही मालमत्ता विकल्यावर कर भरावा लागतो.

Web Title: tax rules on which gifts you may have to pay income tax and which gifts are tax free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.