- उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउंटंट)अर्जुन : कृष्णा, यावर्षी ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक करदात्यांचा टर्नओव्हर लक्षणीय वाढला आहे. पण इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट फाइल करण्याची शेवटची तारीख नेमकी कधी आहे?कृष्ण : अर्जुन, ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट फाइल करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे, ज्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे अन्यथा दंड लागू शकताे.अर्जुन : कृष्णा, ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट कोणाला फाइल करावा लागतो?कृष्ण : अर्जुन, करदात्यांचा व्यवसाय वाढत असताना, ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याच्या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे:१. व्यवसायिक करदात्यांसाठी (विविध अटी) : जर करदात्यांची एकूण विक्री, उलाढाल एका आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर करदात्यांना ऑडिट करून ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, जर करदात्यांची एकूण विक्री, उलाढाल दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त नसेल तसेच आर्थिक वर्षात एकूण कॅश रिसिट आणि कॅश पेमेंट्स हे एकूण रिसिट आणि एकूण पेमेंट्सच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त नसेल, तर अशा काही अटींवर करदात्याला ट्रॅक्स ऑडिटची आवश्यकता नसू शकते. जर करदाता सेक्शन 44AD अंतर्गत प्रिझेंटिव्ह टॅक्सची योजना स्वीकारत असेल, तर ही मर्यादा दोन कोटी रुपयांपर्यंत वाढते.उदाहरण : जर एखाद्या करदात्याची उलाढाल दीडी कोटी रुपयांची असेल आणि त्याने ही योजना स्वीकारली असेल, तर ट्रॅक्स ऑडिटसाठी उलाढाल मर्यादा २ कोटींपर्यंत वाढते आणि अशा परिस्थितीत त्याला ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची आवश्यकता नाही.२. प्रिझेंटिव्ह टॅक्स (सेक्शन 44AD) योजनेतून बाहेर पडणारे व्यवसाय : जर करदाता प्रिझेंटिव्ह टॅक्सच्या योजनाेंतर्गत निर्धारित टक्केवारीपेक्षा कमीउत्पन्न घोषित करत असेल, आणि त्याचे उत्पन्न बेसिक एक्सेम्प्शन मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर अशा करदात्यांना ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करणे आवश्यक आहे.३. व्यावसायिकांसाठी : जर व्यावसायिक करदात्याची एकूण रिसीट एका आर्थिक वर्षात ५० लाखांपेक्षा जास्त असेल, तर अशा करदात्यांना बुक्सचे ऑडिट करून ट्रॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करणे आवश्यक आहे.