- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट
अर्जुन : कृष्णा, विघ्नहर्ता गणपती भक्तांच्या “विघ्नांचे” निराकरणकरण्यासाठी येणार आहे. सप्टेंबर महिन्यात करदात्यांना कोणत्या “विघ्नांना” सामोरे जावे लागेल?
कृष्ण : गणेश चतुर्थी हे प्रारंभाचे प्रतीक आहे. सप्टेंबर हा करदात्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना आहे. ज्या करदात्यांना त्यांच्या लेखापुस्तकांचे २०२१-२२चे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांनी ३० सप्टेंबर २०२२पर्यंत त्यांचा ऑडिट रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करताना करदात्यांना जीएसटीची देखील माहिती द्यावी लागेल. २०२१-२२साठी जीएसटी रिटर्न भरताना झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठीही हा शेवटचा महिना आहे.
अर्जुन : २०२१-२२साठी इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्टच्या संबंधित करदात्यासमोर येणारी विघ्ने कोणती ?
कृष्ण : २०२१-२२च्या हिशोबाची पुस्तके सप्टेंबर २०२२पर्यंत पूर्ण करावी लागतील. या पुस्तकांना अंतिम रुप देताना करदात्यांनी आपले जीएसटी दायित्व निश्चित करून त्याची नोंद पुस्तकात घेतली पाहिजे. करदात्याला ऑडिट रिपोर्टमध्ये जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या संस्थांच्या/व्यक्तीच्या संबंधित एकूण खर्चाची तपशीलवार माहिती देण्याच्या “विघ्नांचा” सामना करावा लागेल. आवक खर्चाचे विभाजन खालीलप्रमाणे द्यावे लागेल :
१. जीएसटीमधून सूट मिळालेल्या वस्तू किंवा सेवांशी संबंधित. २. कंपोझिशन योजनेंतर्गत येणाऱ्या घटकांशी संबंधित. ३. इतर नोंदणीकृत संस्थांशी संबंधित. ४. जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या घटकांशी संबंधित.
- वरील सर्व माहिती ऑडिट रिपोर्टमध्ये देणे आवश्यक आहे. करदात्याला AIS आणि पुस्तकांमधील खरेदी तसेच फॉर्म 26AS आणि पुस्तकांमधील विक्रीचा ताळमेळ या विघ्नांना सामोरे जावे लागेल.
अर्जुन : सप्टेंबर २०२२चे जीएसटी रिटर्न भरताना कोणत्या विघ्नांचा सामना करावा लागू शकतो?
कृष्ण : झालेल्या चुकांच्या दुरूस्त्या करण्यासाठी सप्टेंबर २०२२ हे शेवटचे रिटर्न आहे. करदात्यांनी हिशोबाची पुस्तके आणि जीएसटी रिटर्नचा ताळमेळ घालावा. रिटर्नमध्ये न दाखविलेल्या परंतु हिशोबाच्या पुस्तकांमध्ये दिलेल्या व्यवहारांचे तपशील दिले जावेत.
Tax: करदात्यांच्या नशिबी कोणती ‘विघ्ने’?
Taxpayers: सप्टेंबर महिन्यात करदात्यांना कोणत्या “विघ्नांना” सामोरे जावे लागेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:32 AM2022-08-29T05:32:08+5:302022-08-29T05:32:29+5:30