नवी दिल्ली : विदेशातील खात्यांच्या माध्यमातून होणारी कर चोरी रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एफएटीसीएच्या अंमलबजावणीसाठी करारावर गुरुवारी स्वाक्षरी केली. या करारानुसार दोन्ही देशांत १ आॅक्टोबरपासून कराशी संबंधित सूचनांची देवाणघेवाण होईल.विदेशी खाते कर अनुपालन करारावर महसूल सचिव शक्तिकांत दास आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी स्वाक्षरी केली. रिचर्ड वर्मा यावेळी म्हणाले की, ‘कर चोरी रोखण्यासाठी एफएटीसीए हा संयुक्त प्रयत्न असून, त्याचा दोन्ही देशांना लाभ होईल. एफएटीसीएमुळे करांची चोरी उघडकीस येईल.
भारत-अमेरिकेत करविषयक करार
By admin | Published: July 10, 2015 12:54 AM