Join us

विरोधकांच्या अडथळ्यांनंतरही करप्रणालीतील बदल निर्विघ्न, जीएसटीचा खालच्या स्तराचा करणार विस्तार :अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:18 AM

चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधकांनी जीएसटी अंमलबजावणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतातील जीएसटी ही नवी करप्रणाली सहजपणे आणणे शक्य झाले, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

वॉशिंग्टन : चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधकांनी जीएसटी अंमलबजावणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतातील जीएसटी ही नवी करप्रणाली सहजपणे आणणे शक्य झाले, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.जेटली सध्या अमेरिका दौ-यावर आले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ते उपस्थिती लावणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये भाषणात जेटली म्हणाले की, काही विरोधी पक्षांनी जीएसटीची गाडी रुळावर येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. पण त्यांच्या पक्षांच्या राज्य सरकारांनीही त्यांचे म्हणणे ऐकले नाही. जीएसटीचा ८0 टक्के हिस्सा आपल्यालाच मिळणार आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे राज्यांनी आपल्या केंद्रीय पक्षनेतृत्वाचे अजिबात ऐकले नाही.अरुण जेटलींनी सांगितले की, राज्य सरकारे समजूतदार होत आहेत. जीएसटीबाबत मुख्य समस्या ही आहे की, जे लोक कर नियमांचे पालन करीत नव्हते, ते योगायोगाने पकडीत सापडले आहेत. त्यातून विभिन्न प्रकारच्या तक्रारी समोर आल्या. काही समस्या खºया आहेत. काही मात्र करचोरांनी बचावासाठी निर्माण केलेल्या आहेत. दोन्ही समस्यांत फरक करण्याची क्षमता सर्व सरकारमध्ये असली पाहिजे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :अरूण जेटलीजीएसटी