Join us

जीएसटीमधील डेव्हलपमेंट राइट््सची करपात्रता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:00 AM

१ एप्रिल, २०१९ पासून डेव्हलपमेंट राइट्सच्या करपात्रतेत कोणते बदल करण्यात आले आणि जेडीए व टीडीआर म्हणजे काय?

- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ एप्रिल, २०१९ पासून डेव्हलपमेंट राइट्सच्या करपात्रतेत कोणते बदल करण्यात आले आणि जेडीए व टीडीआर म्हणजे काय?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीमध्ये १ एप्रिल, २०१९ पासून डेव्हलपमेंट राइट्सच्या करपात्रतेत बदल करण्यात आले. त्या आधी जेडीए/टीडीआर म्हणजे काय ते समजून घेऊ या. नवीन प्रकल्प तयार करण्याआधी जमीनदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्यामधील झालेल्या करारास जेडीए (जॉर्इंट डेव्हल्पमेंट अ‍ॅग्रीमेंट) असे म्हणतात. जेडीए मध्ये जमीनदार जमिनी प्रदान करतात आणि बांधकाम व्यावसायिक बांधकाम आणि कायदेशीर कामे करतात. टीडीआर (ट्रान्स्फरेबल डेव्हल्पमेंट राइट्स) म्हणजे जेथे बांधकाम व्यावसायिकांना डेव्हलपमेंट राइट्स करतो.अर्जुन: कृष्णा, जीएसटीमध्ये डेव्हलपमेंट राइट्सवर करपात्रता आहे का आणि कोणत्या दराने जीएसटी भरावा लागेल?कृष्ण : अर्जुना, जेव्हा जमीनदार बांधकाम व्यावसायिकांना डेव्हलपमेंट राइट्स प्रदान करेल, तेव्हा त्यावर सवलत दिली जाईल. (अट -बांधकाम व्यावसायिकांनी सर्व फ्लॅट्स कम्प्लीशन सर्टिफिकेट जारी करण्याआधी विक्री करावे आणि त्यावर कर भरावा.) जर बांधकाम व्यावसायिकांनी कम्प्लीशन सर्टिफिकेट जारी केल्यानंतर फ्लॅट्ची विक्री केली, तर त्यावर आरसीएम अंतर्गत अ‍ॅफोर्डेबल रेसिडेंशल सोसायटीमधील अपार्टमेंटवर १ टक्के दराने व व्यतिरिक्त सोसायटीमधील अपार्टमेंटवर ५ टक्के दराने जीएसटी भरावा लागेल.अर्जुन: कृष्णा, जेव्हा बांधकाम व्यावसायिकांनी कम्प्लीशन सर्टिफिकेट जारी केल्यानंतर फ्लॅट्ची विक्री केली, तर त्यावर जीएसटी भरण्यास कोण जबाबदार असेल?कृष्ण : अर्जुना, बांधकाम व्यावसायिकांना आरसीएमअंतर्गत जीएसटी भरावा लागेल. डेव्हलपमेंट राइट्सची करपात्रता ही कम्प्लीशन सर्टिफिकेटच्या तारखेस हाती असलेल्या विक्री न झालेल्या इनव्हेंट्रीवर अवलंबून असेल. बांधकाम व्यावसायिकांना जमीनदारांकडून मिळालेल्या कम्प्लीशन सर्टिफिकेटच्या तारखेस विक्री न झालेल्या फ्लॅट्सच्या राइट्सवर कर भरावा लागेल.अर्जुन: कृष्णा, जर जमीनदारांकडून प्राप्त झालेले राइट्स बांधकाम व्यावसायिकांनी निवासी, तसेच व्यवसायिक युनिट्सच्या बांधकामासाठी वापरले, तर त्यावरील जीएसटीमधील करपात्रता कशाप्रकारे असेल?कृष्ण: अर्जुना, डेव्हलपमेंट राइट्सचा वापर केवळ निवासी युनिट्सच्या बांधकामासाठी असेल, तर त्यावर जीएसटी आकारला जाणार नाही आणि व्यावसायिक युनिट्सच्या बांधकामासाठी जर डेव्हलपमेंट राइट्सचा वापर केला गेला, तर त्यावर जीएसटी आकारला जाईल.अर्जुन: कृष्णा, डेव्हलपमेंट राइट्सवर जीएसटीकेव्हा भरावा लागेल आणि त्यांचे मूल्याकंन कशाप्रकारे होईल?कृष्ण: अर्जुना, बांधकाम व्यावसायिकांना कम्प्लीशन सर्टिफिकेटच्या तारखेस जीएसटी भरावा लागेल. बांधकाम व्यावसायिकांनी जमीनदाराकडून जे राइट्स प्राप्त केले, त्याचे मूल्यांकन हे कम्प्लीशन सर्टिफिकेटच्या तारखेस अशाच प्रकारच्या अपार्टमेंटसाठी खरेदीदारांना आकारलेल्या किमतीसमान असेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण: अर्जंुना, रिअल इस्टेट क्षेत्रावरील जीएसटीची करपात्रता अडचणीची झालेली आहे. यामध्ये कम्प्लीशन सर्टिफिकेटची महत्त्वाची भूमिका अतिशय आहे. जमीनदार व बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासंबंधी व्यवहार करण्याआधी जीएसटीमधील रिअल इस्टेटवर लागू होणाऱ्या नियम, विभाग इत्यादीचा बारकाईने अभ्यास करावा.

टॅग्स :जीएसटीकर