Join us

बचतीवरील करसवलत होऊ शकते दोन लाख

By admin | Published: June 30, 2014 10:31 PM

आगामी अर्थसंकल्पात घरगुती बचतीला प्रोत्साहन देतानाच बचतीवरील करसवलतीची मर्यादा दोन लाख रुपयांवर जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : आगामी  अर्थसंकल्पात घरगुती बचतीला प्रोत्साहन देतानाच बचतीवरील करसवलतीची मर्यादा दोन लाख रुपयांवर जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या बचतीवरील करसवलतीची सीमा एक लाख रुपयांर्पयत आहे. आगामी अर्थसंकल्पात आयकर कायद्याच्या 8क् सी,8क्सीसी आणि 8क्सीसीसी या कलमांखाली मिळणा:या करसवलतीची मर्यादा दोन लाख रुपयांवर नेली जाऊ शकेल. यामुळे सरकारचा किती महसूल कमी होऊ शकेल याबाबत विचार केला जात असून त्यानंतीच अंतिम निर्णय होऊ शकेल.
बॅँका आणि विमा कंपन्यांकडून बचतीवरील करसवलत वाढवून मिळावी यासाठी दबाव आहे. ही सवलतीची मर्यादा वाढल्यास घरगुती गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही सवलत वाढविल्यास पगारदारांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सन 2क्क्8 मध्ये देशांतर्गत घरगुती उत्पादनाचे प्रमाण एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 38 टक्के होते.
4सन 2क्12-13 मध्ये हा दर कमी होऊन 3क् टक्क्यांवर आला आहे.
4जीवन विमा, पीपीएफ, भविष्य निर्वाह निधी, गृहकर्जावरील व्याज, पाच वर्षाच्या बॅँकेच्या मुदतठेवी आणि म्युच्युअल फंडांच्या ईएलएसएस यामध्ये केलेली गुंतवणूक सुटीला पात्र असते.