नवी दिल्ली : वित्तमंत्रालयाने आयकर अधिनियमामधील ११ डीडीमध्ये दुरुस्ती केल्याने कर्करोग, एड्स, थॅलिसिमिया आणि हेमोफेलिया यासारख्या गंभीर रोगांवरील उपचारावर झालेल्या खर्चात करसवलत मिळविण्यासाठी आता सरकारी इस्पितळांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही.
सरकारच्या या निर्णयाने आता या रोग्यांच्या उपचारावर झालेल्या खर्चाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी इस्पितळातून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा मारण्याची गरज नाही.
आतापर्यंत या गंभीर रोगांवर झालेल्या खर्चावर करसवलत मिळविण्यासाठी सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरकडून प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. आयकर अधिनियम ८० डीडीबीतहत पीडितांना खर्चावरील रकमेत करसवलत मिळत होती. आता या दुरुस्तीमुळे कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेऊन आयकर विभागात जमा केले जाऊ शकते. त्यामुळे करसवलत मिळू शकेल. आयकर अधिनियम ८० डीडीबीतहत या गंभीर रोगांनी पीडितांना ४० हजार रुपयांपर्यंत, तर ज्येष्ठ नागरिकांना ६० हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळते. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ८० हजार रुपयांपर्यंतही सवलत मिळते. ही करसवलत करदाते किंवा पती, पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ यांना दिली जाते.
>सध्याच्या तरतुदीनुसार गंभीर रोगांवरही उपचारावर झालेल्या खर्चाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळविणे सक्तीचे होते. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
>वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार ही अट आता रद्द करण्यात आली आहे. उपचार करणाऱ्या कोणत्याही डॉक्टरच्या प्रमाणपत्रावर कर सवलत मिळेल.
गंभीर आजारांवरील करसवलत सोपी
वित्तमंत्रालयाने आयकर अधिनियमामधील ११ डीडीमध्ये दुरुस्ती केल्याने कर्करोग, एड्स, थॅलिसिमिया आणि हेमोफेलिया यासारख्या गंभीर रोगांवरील उपचारावर झालेल्या
By admin | Published: October 15, 2015 11:56 PM2015-10-15T23:56:20+5:302015-10-15T23:56:20+5:30