लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उच्च उत्पन्न असणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावण्याबाबत सरकारने विचार करावा, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केले आहे. अर्थात, यामुळे छोट्या शेतकऱ्यांना झळ बसायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे एका मुलाखतीत जालान म्हणाले की, जर आपल्याकडे अधिक कृषी जमीन आहे आणि त्यात निश्चित मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न होत असेल, तर त्यावर कर लावण्याचा विचार तुम्ही करू शकता, पण देशात मोठ्या संख्येने लहान शेतकरी आहेत. त्यांना आर्थिक फटका बसेल, असे कोणतेही पाऊल उचलू नये. महागाई कमी करणे आणि विकासदर अधिक ठेवण्याची कामगिरी एनडीए सरकार करत आहे. प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी या सरकारने प्रयत्न केले आहेत. भारतीय बँकिंग प्रणालीवर बोलताना ते म्हणाले की, देशातील बँकिंग प्रणाली मजबूत आहे.
श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावा : जालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 12:45 AM