नवी दिल्ली : सरकारी तिजोरीत २०१६-१७ या आर्थिक वर्षात नियोजित लक्ष्यापेक्षा अधिक कर संकलन झाले आहे. यात १८ टक्क्यांची वाढ होऊन १७.१० लाख कोटींचा कर जमा झाला असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली. गत सहा वर्षात जमा झालेला हा सर्वाधिक कर आहे.
सरकारने १ फेबु्रवारी २०१७ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गत वर्षाचा कर १६.९७ लाख कोटी राहील असा अंदाज लावला होता. महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले की, गतवर्षीच्या तुलनेत यात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण १७.१० लाख कोटी रुपयांचा कर सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ या काळात निव्वळ प्रत्यक्ष कर ८.४७ लाख कोटी रुपये आहे.
जे लक्ष्य ठेवण्यात आले होते ते शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०१७ पर्यंत अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य १०१.३५ टक्के होते. अप्र्रत्यक्ष करासाठी ८.५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य होते. कंपनी करात १३.१ टक्क्यांची तर व्यक्तिगत आयकरात १८.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात एकूण १.६२ लाख कोटी रुपये रिफंड जारी करण्यात आला. एक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रिफंडच्या तुलनेत हा ३२.६ टक्के अधिक होता.
अप्रत्यक्ष करात केंद्रीय अबकारी कर ३३.९ टक्के वाढून ३.८३ लाख कोटी रुपये झाला आहे.
सेवाकरात २०.२ टक्के वाढ होऊन तो २.५४ लाख कोटी रुपये झाला आहे. सीमा शुल्क मागील वर्षाच्या तुलनेत ७.४ टक्के वाढून २.२६ लाख कोटी झाले आहे.
>प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करवसुलीही वाढली
एप्रिल ते मार्च या काळातील प्रत्यक्ष कर 14.2 % वाढून 8.47 लाख कोटी रुपये झाला
एप्रिल ते मार्च या काळातील अप्रत्यक्ष कर 22 % वाढून 8.63 लाख कोटी रुपये झाला
सरकारी तिजोरीत जमा झाला १७.१० लाख कोटींचा कर
सरकारी तिजोरीत २०१६-१७ या आर्थिक वर्षात नियोजित लक्ष्यापेक्षा अधिक कर संकलन झाले
By admin | Published: April 5, 2017 04:23 AM2017-04-05T04:23:59+5:302017-04-05T04:23:59+5:30