Join us

२,४२८ कोटींचा कर वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2016 11:33 PM

विदेशातील अघोषित धन-संपत्तीबाबत माहिती देण्यासंबंधीच्या नवीन कायद्यातहत ६४४ लोकांनी ४,१६४ कोटी रुपयांची धन-संपत्ती घोषित केली असून

नवी दिल्ली : विदेशातील अघोषित धन-संपत्तीबाबत माहिती देण्यासंबंधीच्या नवीन कायद्यातहत ६४४ लोकांनी ४,१६४ कोटी रुपयांची धन-संपत्ती घोषित केली असून, त्यांच्याकडून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत २,४२८.४ कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सांगितले की, ३१ डिसेंबरपर्यंत कर आणि दंडाच्या रूपात २,४२८.४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तथापि, अपेक्षापेक्षा ही रक्कम कमी आहे. काळापैसा विरोधी कायद्यातहत अनुपालन खिडकी सुविधा ३० सप्टेंबर २०१५ रोजी बंद झाली. यादरम्यान एकूण ४,१६४ कोटी रुपयांच्या विदेशातील काळ्या पैशाबाबत ६४४ लोकांनी माहिती दिली आहे. विदेशाती बेहिशेबी पैसा-संपत्तीची घोषणा करणाऱ्यांना ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत घोषित रकमेवर ३० टक्के कर आणि ३० टक्के दंड चुकता करायचा होता. त्यानुसार २,४२८.४ कोटी रुपये मिळाले आहेत. ३१ डिसेंबरनंतर कर आणि दंडाच्या रूपात मिळालेली रक्कम यात मिळविल्यास ही रक्कम वाढू शकते.काळापैसा विरोधी नवीन कायदा (अघोषित विदेशी उत्पन्न-संपत्ती कराधान कायदा) १ जुुलै २०१५ पासून लागू करण्यात आला. या कायद्यातहत वन-टाईम विंडो (एकल अनुपालन खिडकी) सुरू करण्यात आली होती. यामार्फत विदेशातील अघोषित धन-संपत्तीबाबत माहिती देण्याची सुविधा देण्यात आली होती. तसेच यावरील कर आणि दंड चुकता केल्यास कारवाईपासून मुक्ती देण्यात आली होती.