करनीती भाग २०६ - सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सर्व करदात्यांना जुलै महिन्याचे फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करायचे आहेत, तर फॉर्म जीएसटीआर-२ नेमका काय आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, फॉर्म जीएसटीआर-२ हा करदात्याने केलेल्या वस्तू आणि सेवांच्या आवक पुरवठ्याचा तपशील आहे. तो नोंदणीकृत करदात्याला दर महिन्याला दाखल करावा लागेल. फॉर्म जीएसटीआर-२ हा संबंधित पुरवठादाराने दाखल केलेल्या फॉर्म जीएसटीआर-१ वरून स्वयंनिर्मित होईल. उदा: ‘अ’ने ‘ब’ला काही मालाचा पुरवठा केला, तर ‘अ’ हा पुरवठादार असून, यांनी जीएसटीआर-१ रिटर्नमध्ये आपल्या माल पुरवठ्याची माहिती दिली असेल. ही माहिती ‘ब’ ला त्याच्या जीएसटीआर-२अमध्ये दिसेल. यावर जी कारवाई असेल, ती ‘ब’ला त्याच्या जीएसटीआर-२मध्ये करावी लागेल.अर्जुन : कृष्णा, कर कालावधीसाठी फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करण्याची देय तारीख काय आहे?कृष्ण : अर्जुना, फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करण्याची देय तारीख कर कालावधीच्या पुढील महिन्याची १५ तारीख असेल, परंतु मंडळ किंवा आयुक्त अधिसूचनेद्वारे फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करण्याची देय तारीख वाढवू शकते. जुुलैच्या जीएसटीआर-२चे रिटर्न ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत फाइल करावा लागेल. त्यासाठी तारीख वाढवून दिली आहे.अर्जुन : कृष्णा, फॉर्म जीएसटीआर-२ कोणी दाखल करावा?कृष्ण : प्रत्येक करदात्याने मासिक तत्त्वावर संबंधित पुरवठादाराने दाखल केलेल्या फॉर्म जीएसटीआर-१ वरून स्वयंनिर्मित झालेल्या माहितीच्या आधारे फॉर्म जीएसटीआर-२ त्यातील माहिती ंूूीस्र३, १ी्नीू३, ेङ्म्िरा८ ङ्म१ स्रील्ल्िरल्लॅ ठेऊन दाखल करावा. संबंधित पुरवठादाराने दाखल केलेल्या फॉर्म जीएसटीआर-१ मध्ये घोषित न केलेली आवक पुरवठ्याची माहिती प्राप्तकर्ता त्यात टाकू शकतो. एखाद्या कर कालावधीत व्यवसाय झाला नसेल, तरीही फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करावा लागेल.अर्जुन : कृष्णा, कोणते करदाते फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करण्यातून मुक्त आहेत?कृष्ण : अर्जुना, पुढील करदाते फॉर्म जीएसटीआर-२ दाखल करण्यातून मुक्त आहेत:- इनपुट सेवा वितरक- कंपोझिशन स्कीमअंतर्गत नोंदणीकृत व्यक्ती- अनिवासी करपात्र व्यक्ती- कलम ५१ आणि कलम ५२ अंतर्गत कर देय असलेले करदाते (टीडीएस आणि टीसीएस)अर्जुन : कृष्णा, फॉर्म जीएसटीआर-२अ काय आहे आणि त्याचे काय करायचे आहे?कृष्ण : अर्जुना, फॉर्म जीएसटीआर-२अ हा फक्त वाचण्यासाठी आहे. त्यात संबंधित पुरवठादाराने दाखल केलेल्या फॉर्म जीएसटीआर-१मधील खरेदीची माहिती दिसते. त्यातील तपशील हा फॉर्म जीएसटीआर-२ मध्ये ंूूीस्र३, १ी्नीू३, ेङ्म्िरा८ ङ्म१ स्रील्ल्िरल्लॅ करून त्यावर क्रिया करावी.कोणतेही बदल करण्यापूर्वी दिलेली माहिती तपासून घ्या की;- बिल क्रमांक बरोबर आहे किंवा नाही.- माल पुरवठ्याची तारीख तपासून घ्यावी.- माल पुरवठ्याची ठिकाणाची माहिती तपासून घ्यावी- टॅक्सची रक्कम त्याचा रेट आणि हे तपासून पाहावे की, क्रेडिट हे इनपुट, इनपुट सर्व्हिस, कॅपिटल गुड्स, किंवा हे क्रेडिट आपल्याला कायदेशीरपणे घेता येणार किंवा नाही, ते नीट तपासून घेणेअर्जुन : कृष्णा, करदात्याने फॉर्म जीएसटीआर-२अ मधील तपशिलावर ंूूीस्र३, १ी्नीू३, ेङ्म्िरा८ ङ्म१ स्रील्ल्िरल्लॅ करून क्रिया केल्यानंतर काय करावे?कृष्ण : अर्जुना, करदात्याने फॉर्म जीएसटीआर-२अ मधील तपशिलावर ंूूीस्र३, १ी्नीू३, ेङ्म्िरा८ ङ्म१ स्रील्ल्िरल्लॅ करून क्रिया केल्यानंतर:- गहाळ झालेल्या पावत्या किंवा इतर तपशील टाकावा.- स्वयंनिर्मित झालेल्या इतर माहितीवर क्रिया करावी.- फॉर्म जीएसटीआर-२ चे पूर्वावलोकन करावे.- माहिती ा१ीी९ी होण्यासाठी फॉर्म जीएसटीआर-२ सबमिट करावा.- फॉर्म जीएसटीआर-२ हा ऊरउ किंवा एश्उ द्वारे दाखल करावा.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-२ मध्ये मिळाणारे क्रेडिट आणि जीएसटी फॉर्म ३-बीमध्ये दिलेली क्रेडिटसंबंधी माहिती यांच्यामध्ये फरक असल्यास काय होईल?कृष्ण : अर्जुना, हा फार चांगला प्रश्न विचारला! सगळ्यांनी हे लक्षात घ्यावे की, जीएसटीआर-२ मिळणारे क्रेडिट हे त्या महिन्यासाठी भेटणार अंतिम क्रेडिट असेल, जर जीएसटी ३ बी आािण जीएसटीआर-२ मध्ये फरक असेल, त्या फरकाची रक्कम व्याजासह शासनाकडे जमा करावी लागेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, करदात्याला विक्रीबरोबरच खरेदीसुद्धा तपासावी लागेल. त्यांना खरेदी-विक्रीचीसर्व पुस्तके अद्ययावत ठेवावी लागतील. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्यावे की, जुने दिवस गेले, जीएसटीचे दिवस आले.
करदात्यांनो, जीएसटीआर-२ फॉर्ममध्ये खरेदी तपासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:30 AM