Lokmat Money > बिझनेस न्यूज > PAN नंबर न दिल्यास भरावा लागणार दुप्पट टॅक्स; 1 एप्रिलपासून बदलणार नियम

PAN नंबर न दिल्यास भरावा लागणार दुप्पट टॅक्स; 1 एप्रिलपासून बदलणार नियम

206C कलमानुसार परदेश प्रवासावर TCS लावण्यात आला आहे. जर पॅन नंबर नसेल तर दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:56 AM2020-03-21T10:56:03+5:302020-03-21T10:56:20+5:30

206C कलमानुसार परदेश प्रवासावर TCS लावण्यात आला आहे. जर पॅन नंबर नसेल तर दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. 

taxpayers have option from new tax regime costlier foreign tours changes april 1 without pan card vrd | PAN नंबर न दिल्यास भरावा लागणार दुप्पट टॅक्स; 1 एप्रिलपासून बदलणार नियम

PAN नंबर न दिल्यास भरावा लागणार दुप्पट टॅक्स; 1 एप्रिलपासून बदलणार नियम

नवी दिल्लीः पॅन कार्ड हा भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेला एक पुरावा आहे. प्राप्तिकर भरताना पॅन कार्डची आवश्यकता लागते. मोठ्या पगारदार व्यक्तींनाच पॅन कार्डाची गरज असते, असा काहींचा समज आहे. परंतु असं काहीही नाही. पॅन कार्ड हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा पुरावा आहे. केंद्रानं पॅन कार्डाचं महत्त्व वाढवण्यासाठी आर्थिक वर्षं 2020-21मध्ये एक प्रस्तावही ठेवला आहे. या प्रस्तावानुसार पॅन कार्ड नसल्यास परदेश प्रवासादरम्यान जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 206C कलमानुसार परदेश प्रवासावर TCS लावण्यात आला आहे. जर पॅन नंबर नसेल तर दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. 

अशी असेल नवी तरतूद
वित्त विधेयकाच्या नव्या नियमांनुसार, परदेश प्रवासात खर्च होणाऱ्या एकूण पॅकेजवर 5 टक्के टॅक्स कलेक्शन एट सोर्स (टीसीएस) स्वतंत्रपणे द्यावा लागणार आहे. तसेच टूर पॅकेज घेणाऱ्यांकडे पॅन नंबर नसल्यास त्यांना एकूण पॅकेजच्या 10 टक्के टीसीएस भरावा लागणार आहे. म्हणजे पॅन नंबर नसल्यास दुप्पट टॅक्स चुकवावा लागणार आहे. सरकारी आकड्यांनुसार, देशभरात 1.5 कोटी लोक टॅक्स देतात, तर तीन कोटी लोक वर्षभरात परदेश दौरे करतात. 

एवढा भरावा लागणार TCS
जर कोणत्याही टूर पॅकेजचा खर्च 1 लाख रुपये असल्यास त्याला स्वतंत्रपणे 5000 रुपये TCS द्यावा लागणार आहे. टूर्स आणि ट्रॅव्हल कंपनी पॅकेजनुसार TCS वसूल करणार आहे. टीसीएसची रक्कम सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. आयटीआर फाइल करताना टीडीएसची रक्कम परत मिळवण्यासाठी अर्जही करता येणार आहे. पण त्यात परदेश दौऱ्याचा उल्लेख करावा लागणार आहे. 

ITRमध्ये द्यावी लागणार परदेश दौऱ्याची माहिती
केंद्राला उत्पन्न कमी दाखवणारे लोक ITRमध्ये परदेश दौऱ्याचा उल्लेख करण्यास कचरतात. पण एखाद्या व्यक्तीनं टूर पॅकेज घेतलं नाही. तसेच तो स्वतंत्रपणे तिकीट खरेदी करून परदेशात जात असल्यास त्याला कोणताही टीसीएस द्यावा लागणार नाही. टीसीएस कापून घेतल्यानंतर लागलीच प्राप्तिकर विभागाला याचा अलर्ट मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर होणार आहे. कारण बाहेर जाण्याची व्यवस्था कोणीही केलेली असली तरी TCS हा कर्मचाऱ्यांकडूनच वसूल केला जाणार आहे. 
 

Web Title: taxpayers have option from new tax regime costlier foreign tours changes april 1 without pan card vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.