Lokmat Money > बिझनेस न्यूज > TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा

TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा

TBO Tek IPO: कंपनीचा आयपीओ आज, १५ मे २०२४ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. एनएसईवर हा शेअर ५५ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४२६ रुपयांवर लिस्ट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:36 AM2024-05-15T11:36:27+5:302024-05-15T11:36:40+5:30

TBO Tek IPO: कंपनीचा आयपीओ आज, १५ मे २०२४ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. एनएसईवर हा शेअर ५५ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४२६ रुपयांवर लिस्ट झाला.

TBO Tek IPO Listing As soon as it was listed investors jumps to buy stocks share crossed rs 1400 A solid profit of 55 percent | TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा

TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा

TBO Tek IPO: टीबीओ टेकचा आयपीओ आज, १५ मे २०२४ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. टीबीओ टेक लिमिटेडचे (TBO Tek IPO) इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. टीबीओ टेकचा शेअर आज बीएसईवर १३८० रुपयांवर लिस्ट झाला, जो ९२० रुपयांच्या प्राइस बँडपेक्षा ५० टक्के प्रीमियम आहे. एनएसईवर हा शेअर ५५ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४२६ रुपयांवर लिस्ट झाला.
 

काय आहे डिटेल्स?
 

टीबीओ टेकचा आयपीओ (TBO Tek IPO) ८ मे ते १० मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. नवी दिल्लीस्थित या कंपनीनं आपले शेअर्स ८७५ ते ९२० रुपये प्रति शेअर या फिक्स्ड प्राइस बँडमध्ये ऑफर केले होते. कंपनीनं आयपीओद्वारे १,५५०.८१ कोटी रुपयांपेक्षा थोडी अधिक रक्कम गोळा केली होती, ज्यात ४०० कोटी रुपयांच्या फ्रेश शेअर्सची विक्री आणि १,२५,०८,७९७ शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचाही (ओएफएस) समावेश होता.
 

८६.७० पट सब्सक्राइब
 

हा इश्यू एकूण ८६.७० पट सब्सक्राइब करण्यात आला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा (क्यूआयबी) १२५.५१ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा ५०.६० पट सबस्क्राइब करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या हिस्स्याला अनुक्रमे २५.७४ पट आणि १७.८२ पट सबस्क्रिप्शन मिळालं.
 

२००६ मध्ये सुरू झालेल्या टीबीओ टेकला पूर्वी टेक ट्रॅव्हल्स म्हणून ओळखलं जात होतं. ते एक ट्रॅव्हल डिस्ट्रिब्युटर्स प्लॅटफॉर्म आहे जे आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार ट्रॅव्हल लिस्ट प्रदान करते आणि परकीय चलन सहाय्यासह विविध प्रकारच्या चलनांना समर्थन देते.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: TBO Tek IPO Listing As soon as it was listed investors jumps to buy stocks share crossed rs 1400 A solid profit of 55 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.