गेल्या काही दिवसापूर्वी विप्रो आणि इन्फोसीस या कंपन्यांनी मूनलाईटिंग विरोधात कारवाई केली होती. विप्रोने ३०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याची बातमी समोर आली होती. आता टीएसनेही मूनलाईटिंग विरोधात पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना आता तीन दिवस ऑफीसमध्ये येऊन काम करणे बंधनकारक आहे, असं टीसीएसने एका निवेदनामध्ये म्हटले आहे.
'मूनलाईटिंग एक नैतिक मुद्दा आहे. आणि हे कंपनीच्या मूळ तत्त्वांच्या आणि संस्कृतीच्या विरोधात आहे. कंपनीकडून या विरोधात कर्मचाऱ्यांवर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही, असं या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम खूप प्रचलित झाले होते. आजही अनेक कंपन्यांमध्ये मग ती आयटी असो की अन्य कोणती घरातून काम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देत आहे. परंतू यातील काहीजण याचा गैरफायदा घेत असून, कंपनीच्या कामासोबतच ते आणखी काही ठिकाणची कामे करत आहेत. एकाचवेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करणे याला मूनलाईटिंग म्हटले जाते, सध्या अशी कामे आयटी कंपन्यांमध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आता याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता सप्टेंबर महिन्यापासून आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमधून काम करणे बंधनकारक केले आहे. सिनिअर कर्मचाऱ्यांनी या आधीपासूनच ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. टीसीएसमध्ये मूनलाटिंगचा प्रकार सापडल्यास कर्मचाऱ्यांविरोधत कडक कारवाई होऊ शकते असं निवेदनाध्ये म्हटले आहे.
तीन दिवस ऑफिसमधून काम
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सप्टेंबरमध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयातून काम करण्याचे आदेश दिले आणि कंपनीच्या या नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. कंपनीच्या एचआरने सांगितले की कंपनीचे सर्व वरिष्ठ कर्मचारी आधीच कार्यालयात येत आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास अनुशासनहीनता मानली जाईल आणि अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
विप्रोच्या प्रेमजींनी ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे. यावर विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी ही आमच्यासोबत धोकेबाजी असल्याचे म्हटले होते. आता विप्रोने अशी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणली आहे.
विप्रोने दुसऱ्या कंपनीतही काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. हा शब्द अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरला जातो ज्यांनी गुप्तपणे दुसरी नोकरी देखील स्वीकारली आहे. म्हणजेच आधीच्या कंपनीमध्ये काम करत असताना लपवून ठेवून ते दुसऱ्या कंपनीसाठी काम करत आहेत. दुसरी नोकरी करण्याविरोधात प्रेमजी नाहीत, त्यांना यामध्ये पारदर्शकता हवी आहे, असे विप्रोच्या अधिकाऱ्याने म्हटले.