Lokmat Money > बिझनेस न्यूज > TCS Employees: ऑफिसमध्ये न येणाऱ्या TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

TCS Employees: ऑफिसमध्ये न येणाऱ्या TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

देशातील आघाडीची IT कंपनी टीसीएसनं (TCS) आता एक नवीन नियम आणला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:35 PM2024-04-22T16:35:34+5:302024-04-22T16:36:27+5:30

देशातील आघाडीची IT कंपनी टीसीएसनं (TCS) आता एक नवीन नियम आणला आहे.

TCS displeased with not coming to office employees will not get variable pay know details | TCS Employees: ऑफिसमध्ये न येणाऱ्या TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

TCS Employees: ऑफिसमध्ये न येणाऱ्या TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

TCS variable pay news: देशातील आघाडीची IT कंपनी टीसीएसनं (TCS) आता एक नवीन नियम आणला आहे. कंपनीच्या नवीन धोरणानुसार ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ६० टक्क्यांपेक्षा कमी असेल त्यांना व्हेरिएबल पे मिळणार नाही. म्हणजे त्या लोकांचं यावेळी नुकसान होणार आहे. 
 

आयटी फर्मनं नुकतेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं होतं. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करणं बंधनकारक केलं होतं, मात्र त्यानंतरही अनेक कर्मचारी ऑफिसणध्ये येत नाहीत.
 

नवीन धोरणात असं म्हटलंय की जे कर्मचारी ऑफिसमध्ये आले नाहीत त्यांना व्हेरिएबल पे मिळणार नाही. व्हेरिएबल पे चा लाभ घेण्यासाठी, तुमची ऑफिसमधील उपस्थिती ६० ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान असली पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती ७५ ते ८५ टक्के आहे त्यांना ७५ टक्के व्हेरिएबल पे दिला जाईल. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची कम्प्लायन्स लेव्हल ८५ टक्क्यांहून अधिक आहे त्यांना पूर्ण व्हेरिएबल पे देण्यात येणार आहे.
 

कोणाला किती व्हेरिएबल पे?
 

  • जे ६० टक्क्यांपेक्षा कमी दिवस ऑफिसला येतात त्यांना कोणताही व्हेरिएबल पे मिळणार नाही.
  • याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ६० ते ७५% आहे त्यांना ५०% व्हेरिएबल पे मिळेल.
  • ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ७५ ते ८५% दरम्यान आहे त्यांना ७५% व्हेरिएबल पे मिळेल.
  • ज्यांची उपस्थिती ८५% आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण व्हेरिएबल पे मिळणार आहे.

Web Title: TCS displeased with not coming to office employees will not get variable pay know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.