Lokmat Money > बिझनेस न्यूज > टीसीएस कंपनीच्या शंभरावर कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळते १ कोटीपेक्षा जास्त वेतन

टीसीएस कंपनीच्या शंभरावर कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळते १ कोटीपेक्षा जास्त वेतन

टीसीएसच्या आयुष विज्ञान, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा विभागाचे प्रमुख देबाशीष घोष यांची वार्षिक मिळकत ४.७ कोटींपेक्षा जास्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:53 AM2019-06-14T05:53:49+5:302019-06-14T05:54:04+5:30

टीसीएसच्या आयुष विज्ञान, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा विभागाचे प्रमुख देबाशीष घोष यांची वार्षिक मिळकत ४.७ कोटींपेक्षा जास्त आहे.

TCS employees earn more than 1 crore salary per year | टीसीएस कंपनीच्या शंभरावर कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळते १ कोटीपेक्षा जास्त वेतन

टीसीएस कंपनीच्या शंभरावर कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळते १ कोटीपेक्षा जास्त वेतन

बंगळुरू : वर्षाला १ कोटीपेक्षा जास्त वेतन घेणाºया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) कर्मचाऱ्यांची संख्या वित्त वर्ष २०१९ मध्ये १०० पेक्षा जास्त झाली आहे. या ‘कोट्यधीश’ कर्मचाºयांपैकी एक चतुर्थांश कर्मचाºयांनी करिअरची सुरुवात टीसीएसमध्येच केली आहे.
२०१७ मध्ये टीसीएसमधील कोट्यधीश कर्मचाºयांची संख्या ९१ होती. वित्त वर्ष २०१९ मध्ये ती १०३ झाली आहे. या १०३ जणांत कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथन व सीओओ एन. जी. सुब्रमण्यमन यांच्यासह भारताबाहेर काम करणारे कर्मचारी यांना वगळले.

टीसीएसच्या आयुष विज्ञान, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा विभागाचे प्रमुख देबाशीष घोष यांची वार्षिक मिळकत ४.७ कोटींपेक्षा जास्त आहे. व्यवसाय व तंत्रज्ञान सेवा विभागाचे प्रमुख कृष्णन रामानुजम यांचे वेतन ४.१ कोटींपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या बँकिंग, वित्तीय सेवा व विमा विभागाचे प्रमुख के कृतीवसन यांचे वेतन ४.३ कोटींपेक्षा जास्त आहे. तर मुख्य तंत्रज्ञान अधिकारी के. अनंत कृष्णन यांचे वेतन ३.५ कोटींपेक्षा जास्त आहे. किरकोळ विक्री आणि ग्राहक उत्पादने विभागाचे माजी प्रमुख प्रतीक पाल यांना ४.३ कोटींपेक्षा जास्त वेतन मिळाले. पाल यांना टाटा सन्समध्ये हलविले असून, ते समूहाचे डिजिटल पुढाकाराचे काम पाहत आहेत. संचालकांच्या अहवालातील जोडपत्रातील माहितीनुसार, कोट्यधीश कर्मचाºयांच्या मिळकतीत मूळ वेतनासह भत्ते, रोख प्रोत्साहने, अनुषंगिक लाभांची आयकर नियमानुसार होणारी किंमत आणि कंपनीद्वारे दिले जाणारे भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन निधीतील योगदान यांचा समावेश आहे.

इन्फोसिसमध्ये केवळ ६० जणांनाच
या तुलनेत इन्फोसिसमध्ये १.०२ कोटींपेक्षा जास्त मिळकत असलेल्या कर्मचाºयांची संख्या केवळ ६० आहे. मात्र, इन्फोसिस आपल्या कर्मचाºयांना ज्याप्रमाणे समभाग वितरित करते, तसे टीसीएस करीत नाही.

Web Title: TCS employees earn more than 1 crore salary per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.