Lokmat Money > बिझनेस न्यूज > TCS : ३ वर्षात २ लाख तरुणांना रोजगार; आजवर काही ऑफिसची पायरीही चढले नाहीत, काय म्हणाले COO?

TCS : ३ वर्षात २ लाख तरुणांना रोजगार; आजवर काही ऑफिसची पायरीही चढले नाहीत, काय म्हणाले COO?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल शेअर बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे राहिले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:01 PM2023-10-16T13:01:46+5:302023-10-16T13:03:01+5:30

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल शेअर बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे राहिले नाहीत.

TCS Employment of 2 lakh youth in 3 years Some have never even come to the office what did the COO say work from office company result | TCS : ३ वर्षात २ लाख तरुणांना रोजगार; आजवर काही ऑफिसची पायरीही चढले नाहीत, काय म्हणाले COO?

TCS : ३ वर्षात २ लाख तरुणांना रोजगार; आजवर काही ऑफिसची पायरीही चढले नाहीत, काय म्हणाले COO?

देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. जागतिक आर्थिक वातावरणातील नरमाईमुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल शेअर बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे राहिले नाहीत. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक गणपति सुब्रमण्यम यांनी यावर प्रतिक्रिया दिली. टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूमध्ये चांगले नंबर्स दिसत नसले तरी महसुलाची वाढ उत्तम आहे. टीसीएसनं अलीकडेच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास सांगितलंय.

शेअर्समध्ये घसरण
शेअर बाजारानं सुरुवातीच्य व्यवहारात सोमवारी टीसीएसच्या शेअर्समध्ये जवळपासू एक टक्क्यांची घसरण नोंदवली. कामकाजादरम्यान शेअर ३५४१ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. टीसीएसचा ब्रिटनमधील व्यवसायही आकडेवारीच्या तुलनेत चांगलं काम करत आहे. गेल्या दोन तीन वर्षात टीसीएसनं २ लाखांपेक्षा अधिक तरुणांना नोकरी दिली. परंतु यापैकी काही कर्मचारी आजपर्यंत कार्यालयातही आले नाहीत, असं सुब्रह्मण्यम म्हणाले. 

काय आहेत निकाल?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहिचे निकाल जाहीर केले. यामध्ये त्यांचा निव्वळ नफा ८.५ टक्क्यांनी वाढून ११३४२ कोटी रुपये झाला. टीसीएसच्या संचालक मंडळानं शेअरधारकांसाठी डिव्हिडंटला मंजुरी दिली आहे. यासोबतच त्यांनी शेअर बायबॅकचा निर्णय घेतलाय.

Web Title: TCS Employment of 2 lakh youth in 3 years Some have never even come to the office what did the COO say work from office company result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.