Join us

टाटा आता AI क्षेत्रात आणणार क्रांती! TCS कंपनीची Nvidia सोबत हातमिळवणी; ग्राहकांना कसा होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 1:34 PM

TCS-Nvidia Business Unit : टीसीएसने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. संगणकीय क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या Nvidia सोबत हातमिळवणी केली आहे.

TCS-Nvidia Business Unit : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. हातातील मोबाईलपासून घरातील सर्व उपकरणांमध्ये याचा वापर होत आहे. येत्या काळात एआयमुळे जगात नवीन क्रांती येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यामध्ये आता भारतही मागे राहणार नसल्याचे दिसत आहे. आयटी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी TCS ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठा डाव टाकला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एनव्हीडिया (NVIDIA) या जगातील सर्वात महत्त्वाच्या कंपन्यांच्या सहकार्याने एक नवीन व्यवसाय युनिट सुरू केले आहे. त्याद्वारे, ते अनेक क्षेत्रांमध्ये AI आधारित सेवा प्रदान करणार आहेत.

एनव्हीडियाचे CEO भारत दौऱ्यावरएनव्हीडियाचे CEO जेन्सेन हुआंग सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मुंबईत एका कॉन्क्लेव्हमध्ये ते सहभागी होत आहेत. मुंबईतील Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जेन्सेन हुआंगच्या कंपनीच्या माध्यमातून Nvidia AI वर्ल्ड समिट इंडिया २०२४ मध्ये अनेक आघाडीच्या उद्योगपतींना भेटत आहे. आज या समिटचा दुसरा दिवस आहे. एनव्हीडिया ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे. TCS ने तिच्याशी हातमिळवणी करून एक मोठे व्यावसायिक पाऊल उचलले आहे.

टीसीएसकडून स्टॉक एक्स्चेंजला दिलीटीसीएसने ही माहिती नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. Nvidia सोबत बिझनेस युनिट सेटअपसाठी हातमिळवणी केल्याचे यात सांगण्यात आले आहे. यासह एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले आहे.

टीसीएसला Nvidia AI प्लॅटफॉर्मद्वारे मिळणार मदतटीसीएसच्या या एकत्रित युनिटचे फायदे त्याच्या ग्लोबल एक्सलन्स सेंटर्समध्ये पाहायला मिळतील जेथे Nvidia AI प्लॅटफॉर्मद्वारे मदत दिली जाईल. यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून एनव्हीडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.

एनव्हीडिया आणि टीसीएस एआय बिझेनेसचा कायदा कोणाला मिळणार?टाटा समूहाची कंपनी टीसीएसने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एनव्हीडिया सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता विविध उद्योगांसाठी AI सोल्यूशन्स देईल हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये उत्पादन, बँकिंग आणि वित्तीय सेवा, दूरसंचार, रिटेल वेअरहाउसिंग आणि ऑटोनॉमस वाहने अशी यादी समाविष्ट आहे. कंपनीने ही माहिती दिली आहे.

टॅग्स :टाटाआर्टिफिशिअल इंटेलिजन्स