नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला एप्रिल ते जून या महिन्यांत म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार ००८ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, तो २८ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. (tcs net profit jumps 28 percent to rs 9008 crore in q1 of 2021 22)
उत्तर अमेरिकेतील आमचा व्यवसाय, बीएफएसआय आणि किरकोळ व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. यामुळे कोरोना काळातही कंपनीची स्थिती मजबूत असल्याचे दिसत आहे. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या अन्य सहकार्यांनी याला उत्तम योगदान दिले. ज्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले.
हीच ती वेळ! देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता; हायकोर्टाने केले स्पष्ट
पहिल्या तिमाहीत नफ्यात भरघोस वाढ
TCS ने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत भरघोस नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा २८.५ टक्क्यांनी वाढून तब्बल ९ हजार ००८ कोटी रुपये झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत कंपनीला ७ हजार ००८ कोटींचा नफा झाला होता. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित उत्पन्नही १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न ३८,३२२ कोटी रुपये होते.
देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद होत असताना टीसीएसने मात्र सुमारे २० हजार ४०९ नवीन नोकर्या उपलब्ध करून दिल्या. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ०५ लाख ०९ हजार ०५८ वर गेली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात टीसीएस कॉलेज कॅम्पसमधून ४० हजारांहून अधिक फ्रेशर्सना संधी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.