Join us  

TCS Q1 Results 2023-24: पहिल्या तिमाहीत TCS ची जबरदस्त कामगिरी! ११०७४ कोटींचा नफा; गुंतवणूकदारांना डिव्हिडंट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 5:52 PM

TCS ने पहिल्या तिमाहीत ११०७४ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कंपनीचा ऑपरेटींग महसूल १२.५५ टक्के वाढला असून ५९३८१ कोटी रुपये झाला.

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी TCS ने आज बुधवारी आर्थिक वर्ष २०२३-२४ ची पहिल्या तिमाहिचे निकाल जाहीर केले. जूनच्या तिमाहीत कंपनीला मोठा फायदा झाला आहे. वर्षाच्या आधारावर नफा १६.८३ टक्के वाढून ११,०७४ कोटी रुपये झाला. याअगोदर एक वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीला ९,४७८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा  ११,३९२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

Job Alert: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ४०० जागा; अधिकारी पदासाठी उद्यापासून करा अर्ज

ऑपरेटिंग महसूल किती वाढला?

कंपनीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक आधारावर १२.५५ टक्क्यांनी वाढला आहे आणि तो ५९,३८१ कोटी रुपये झाला आहे. त्यात तिमाही आधारावर किंचित वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत ते ५९,१६२ कोटी रुपये होते. 

कंपनीचा खर्च वाढला

जून तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून ४५,७८९ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ४०,७७१ कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत तो ४४,९४६ कोटी रुपये होता.

जून तिमाहीचे निकाल सादर करणारी पहिली कंपनी

जून तिमाहीचे निकाल जाहीर करणारी TCS ही पहिली कंपनी आहे. सध्या आयटी क्षेत्र चढ-उताराच्या टप्प्यातून जात आहे. भारतीय आयटी क्षेत्र २५० अब्ज डॉलर आहे.

आजच्या सत्रात, टीसीएसच्या समभागाने अल्प श्रेणीत व्यवहार केले. शेअर आज ३,२८०.९५ वर उघडला. समभागाने दिवसभरात ३२८९ चा उच्चांक आणि ३२५० चा नीचांक गाठला. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात टीसीएसचा शेअर ११.४५ रुपये किंवा ०.३६ टक्क्यांनी घसरून ३२६०.२० रुपयांवर बंद झाला. दरम्यान, टीसीएसनं आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर ९ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

सध्या TCS चे मार्केट कॅप ११.९३ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर, TCS ही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

टॅग्स :टाटामाहिती तंत्रज्ञानव्यवसाय