TCS Recruitment : तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे. देशातील तरुणांसाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. अशातच, दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या कंपनीने तरुणांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) चालू आर्थिक वर्षात हजारो फ्रेशर्सना, म्हणजेच नवख्या तरुणांना नोकऱ्या देणार आहे. याआधी, जूनच्या तिमाहीत कंपनीने 5000 हून अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.
टीसीएस हजारो नोकऱ्या देणारचालू आर्थिक वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तब्बल 40 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. म्हणजेच, कंपनी दररोज सुमारे 110 फ्रेशर्सना नोकऱ्या देईल. देशातील तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली आहे. देशात बेरोजगारीचा मुद्दा पेटला असताना TCS ने हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत देशातील इतर आयटी कंपन्यादेखील फ्रेशर्सना नोकऱ्यांची घोषणा करू शकतात.
दररोज 61 जणांना नोकऱ्या दिल्याआपण पहिल्या तिमाहीबद्दल, म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीबद्दल बोललो, तर TCS ने दररोज सुमारे 61 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. TCS ने जून तिमाहीत 5,452 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्यानंतर कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 606,998 झाली आहे. आता आपली भर्ती मोहीम कायम ठेवत कंपनीने चालू आर्थिक वर्षात सुमारे 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखली आहे.