Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी जायंट TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; 100 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज

आयटी जायंट TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; 100 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज

TCS Recruitment Scam : पैसे घेऊन TCS कंपनीत नोकरी लावून दिल्याचे प्रकरण, कंपनीने 16 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले नारळ.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 07:50 PM2023-10-16T19:50:16+5:302023-10-16T19:51:25+5:30

TCS Recruitment Scam : पैसे घेऊन TCS कंपनीत नोकरी लावून दिल्याचे प्रकरण, कंपनीने 16 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले नारळ.

TCS Recruitment Scam: Job Scam in IT Giant TCS; Accused are estimated to have earned Rs.100 crores | आयटी जायंट TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; 100 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज

आयटी जायंट TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; 100 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज

TCS Recruitment Scam : देशातील दिग्गज आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीतील कथित नोकरी घोटाळ्याच्या चौकशीत कंपनीचे 19 कर्मचारी दोषी आढळले असून त्यापैकी 16 जणांना काढून टाकण्यात आले आहे. यापूर्वी कंपनीत हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तातडीने चार अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

19 कर्मचारी दोषी 
अनेक महिन्यांच्या तपासानंतर TCS ने भरती घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबद्दल माहिती दिली. टीसीएसच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तपासणीनंतर 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले, तसेच 6 व्हेंडर्सवर बंदी घालण्यात आली आहे. 

जूनमध्ये घोटाळा उघडकीस आला
TCS चे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उमेदवारांना नोकरी देण्याच्या बदल्यात कर्मचारी संस्थांकडून लाच घेत होते. जून 2023 च्या शेवटी TCS मध्ये भरती घोटाळ्याचे प्रकरण समोर आले. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने व्हेंडर्सनी हा घोटाळा केला होता. हे सर्व अनेक वर्षांपासून सुरू होते. ही बाब उघड झाल्यानंतर टीसीएसने तातडीने कारवाई केली आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (RMG) मधून चार अधिका-यांची हकालपट्टी केली. याशिवाय, तीन स्टाफिंग फर्मवरही निर्बंध लादले होते.

100 कोटींचा घोटाळा
भरती घोटाळ्याच्या तपासानंतर TCS ने आपल्या भरती प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले आणि चार RMG अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. ईएस चक्रवर्ती यांना कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आले. याशिवाय विभागातील आणखी एक अधिकारी अरुण जीके यांनाही कंपनीने बडतर्फ केले आहे. अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत कंपनीने कंत्राटदारांसह 3,00,000 लोकांना कामे दिली. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले असावेत, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

Web Title: TCS Recruitment Scam: Job Scam in IT Giant TCS; Accused are estimated to have earned Rs.100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.