Lokmat Money > बिझनेस न्यूज > टीसीएस देणार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

टीसीएस देणार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

कंपनी ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 04:11 AM2020-10-10T04:11:28+5:302020-10-10T04:11:46+5:30

कंपनी ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देणार

TCS to roll out salary hikes for all employees effective October 1 | टीसीएस देणार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

टीसीएस देणार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने (टीसीएस) सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत १६ हजार नवे कर्मचारी भरले आहेत. कंपनी ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देणार आहे.

‘टीसीएस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी ही माहिती दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. या कालावधीत कंपनीला ५.२४ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला. हा महसूल वार्षिक आधारावर १.७ टक्क्यांनी कमी असला तरी तिमाहीच्या आधारावर ७.२ टक्क्यांनी जास्त आहे.

गोपीनाथन यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीमुळे झालेल्या हानीतून सावरण्याची सुरुवात तिसºया तिमाहीपासून होईल, असे कंपनीने पहिल्या तिमाहीच्या वेळी म्हटले होते. तथापि, सुधारणा आश्चर्यकारकरीत्या दुसºया तिमाहीतच सुरू झाली आहे. डिजिटल क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे ही आश्चर्यकारक वृद्धी कंपनीला मिळाली आहे.

Web Title: TCS to roll out salary hikes for all employees effective October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.