नवी दिल्ली : जर तुमचा टीडीएस (TDS) खूप जास्त कापला गेला असेल तर तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतात. दरम्यान, टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्शन एट सोर्स, जो दरमहा तुमच्या पगारातून कापला जातो. तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत नसला तरीही, तुमचा टीडीएस दर महिन्याला कापला जातो. दरम्यान, नियोक्त्याला एका निश्चित तारखेपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापावा लागतो. पगारदार कर्मचार्यांच्या पगारातून दरमहा टीडीएस कापला जातो, याचे कारण म्हणजे जर कर्मचार्यांनी कंपनीत आपल्या गुंतवणुकीचे पुरावे सादर केले नाहीत, तर कंपनी त्यांच्या नियमांनुसार वेळेवर टॅक्स कापते.
TDS जास्त कापला तर हे काम करा
जर तुमचा टीडीएस खूप जास्त कापला गेला असेल तर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळू शकतात. यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरून तुमच्या पगारातून जास्त कापलेला टॅक्स परत मिळवू शकता. 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी टॅक्स डिपार्टमेंटचे पोर्टल 15 जुलैपासून उघडले आहे, त्याची अंतिम तारीख 31 जुलै ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ते 31 जुलैपूर्वी भरा. यामुळे तुमचा कापलेला टॅक्स वेळेत रिफंड स्वरूपात परत येईल.
ITR करा फाइल
टीडीएस रिफंड मिळवण्यासाठी, तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न 31 जुलै 2022 पूर्वी भरणे आवश्यक आहे. दरम्यान, रिटर्न भरताना तुम्ही त्याचा उल्लेख करावा लागेल,तरच तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. याशिवाय, कापलेला टीडीएम मिळविण्यासाठी, तुम्ही फॉर्म 15G भरून बँकेत सबमिट करू शकता, तुम्हाला टीडीएसचे पैसे देखील परत मिळतील.
जाणून घ्या, TDS क्लेम करण्याची पद्धत
1. सर्वात आधी तुम्ही तुमचा ITR फाइल करा.
2. आता तुम्ही www.incometax.gov.in या वेबसाइटवर जा आणि पेमेंटचे स्टेटस जाणून घ्या.
3. आता User ID आणि Password टाका.
4. यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा ऑप्शन दिसेल.
5. आता 'View File Returns' वर क्लिक करा.
6. यानंतर तुम्हाला ITR चे डिटेल्स दिसतील.