Join us  

Tea: ‘वाघ बकरी’च सर्वाधिक विश्वसनीय चहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 6:13 AM

Wagh Bakri Tea: प्रसिद्ध ‘वाघ बकरी चहा समूहा’ने सलग दुसऱ्या वर्षी ‘सर्वाधिक विश्वसनीय चहा ब्रँड’चा किताब पटकावला आहे. ताज्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : प्रसिद्ध ‘वाघ बकरी चहा समूहा’ने सलग दुसऱ्या वर्षी ‘सर्वाधिक विश्वसनीय चहा ब्रँड’चा किताब पटकावला आहे. ताज्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आपल्या ग्राहकांसोबत मजबूत आणि टिकाऊ नाते असल्याचे वाघ बकरी चहा समूहाने यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांनी सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम चहा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक विश्वसनीय चहा ब्रँड ठरणे हा  आमच्या ब्रँडचा गौरव आहे. आमच्या शतकभराच्या वारशाची तसेच आमच्यावर ग्राहकांनी टाकलेल्या विश्वासाची ही पोहोचपावती आहे. (वा.प्र)

टॅग्स :अन्न