financial habits : प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं. यासाठी लोक आयुष्यभर काबाडकष्ट करतात. आपल्यासारखी काम करण्याची वेळ मुलांवर येऊ नये यासाठीही लोक मेहनत घेतात. पण, मुलांसाठी फक्त संपत्ती जमा करुन उपयोग नाही. तर त्यांना चांगल्या सवयी लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लहान मुलांना बचतीची सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्यांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. लहान मुलं कोणतीही सवय पहिल्यांदा आपल्या आईवडिलांकडूनच शिकतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना चांगल्या सवयी शिकवल्या पाहिजेत.
प्रत्येक पालकाने लहानपणापासूनच आपल्या मुलांना पैशाचे महत्त्व आणि बचत याविषयी सांगितले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आर्थिक सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना लहानपणीच शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे मुलांना यश मिळते. याशिवाय, त्यांना कधीही पैशाची कमतरता भासू नये.
फायनान्सची ओळख
प्रत्येक पालकाने लहानपणापासूनच आपल्या मुलांना फायनान्सबद्दल सांगायला सुरुवात केली पाहिजे. जसे की बचत, पैशाचे महत्त्व इ. यासाठी पालकांनी अजिबात दिरंगाई करू नये. मुलांना पैसे कसे मिळवले जातात आणि ते कसे खर्च केले जातात हे समजावून सांगा. त्यांना पैशाचे महत्त्व आणि ते जबाबदारीने कसे वापरायचे हे शिकवा.
लहान बचतीचे महत्त्व
थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. लहान बचत करून मोठा निधी कसा जमवता येईल हे पालकांनी मुलांना शिकवले पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना बचत करायलाही सांगू शकता. त्यांना पिगी बँक द्यावी जेणेकरून ते पैसे वाचवायला शिकतील.
वाचा - पोस्ट ऑफिस योजनेत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर फिक्स २९,७७६ रुपये परतावा; कोण घेऊ शकतो लाभ?
पॉकेट मनी
मुलांना नियमितपणे पॉकेट मनी (pocket money) द्या. त्यांना त्यांच्या खर्चाचे नियोजन करण्यास शिकवा आणि काही पैसे वाचवायला सांगा. मुलांसाठी बँकेत बचत खाते उघडा. त्यांना त्यांच्या वाढदिवसाला किंवा इतर खास प्रसंगी मिळालेले पैसे या खात्यात जमा करण्यास सांगा.
अनावश्यक खर्च आणि आवश्यक खर्च यातील फरक
तुमच्या मुलांना आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च यातील फरक शिकवा. मुलांना आवश्यक खर्चावरच खर्च करायला शिकवा. तसेच मुलांना त्यांच्या छंदांवर नियंत्रण ठेवायला शिकवा.
आदर्श दाखवा
तुम्ही स्वतः पैसे कसे वाचवता हे मुलांना दाखवा. त्यांना तुमच्या आर्थिक नियोजनाबद्दल सांगा. लहान मुलं आपल्या आईवडिलांनाच आदर्श मानत असतात. त्यामुळे तुमच्या बचतीतून त्यांना प्रेरणा मिळेल.
दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे
तुमच्या मुलांना दीर्घकालीन गुंतवणूक आणि त्याचे फायदे सांगा. त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे पैसे कसे जमा करायचे ते शिकवा.
व्यवसायासाठी प्रोत्साहन द्या
तुमच्या मुलांना लहानपणापासूनच व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करा. त्यांना व्यवसाय आणि नोकरी यातील फरक समजावून सांगा. तुमच्या मुलांना व्यावसायिक कल्पनांसाठी प्रोत्साहित करा.