नवी दिल्ली : महिलांसाठी काम करण्यासाठी सर्वात चांगली जागा (Best Workplace For Women's) ही भारतीय कंपनी विप्रो (Wipro) येथील असल्याचे एका रिपोर्टतून समोर आले आहे. सर्वेक्षणातील अनेक बाबींची पडताळणी केल्यानंतर रिशद प्रेमजी (Rishad Premji) यांच्या नेतृत्वाखालील आयटी कंपनीला महिलांसाठी 'ग्रेट प्लेस टू वर्क' म्हणून निवडण्यात आले आहे. यामध्ये कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांची संख्या आणि या कर्मचाऱ्यांचा कंपनीबाबतचा अभिप्राय (Feedback) हा आधार बनवण्यात आला आहे.
'ग्रेट प्लेस टू वर्क' या जागतिक प्लॅटफॉर्मने महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम कामाच्या ठिकाणासंदर्भात हे सर्वेक्षण केले आहे. प्लॅटफॉर्म दरवर्षी 6 खंडांमधील 60 देशांमधील बिझनेस, नॉन-प्रॉफिट आणि सरकारी संस्थांसह जवळपास 10,000 संस्थांमधील कार्यस्थळांची तपासणी करते. भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोला या वर्षीच्या रिपोर्टमध्ये महिलांसाठी सर्वोत्कृष्ट कार्यस्थळ (वर्क प्लेस) म्हणून निवडण्यात आले आहे.
बिझनेस टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, विप्रोला सर्वात महिला कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ठ वर्क प्लेस यासाठी निवडले आहे की, कंपनी आपल्या विविध आयामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये कंपनीच्या वर्क फोर्समध्ये (Work Force) महिला कर्मचार्यांचे कमीत कमी 10 टक्के आणि कंपनीत काम करण्याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमध्ये (Positive Feedback) किमान 70 टक्के समावेश आहे. याशिवाय, आयटी दिग्गज कंपनीने कामाचा अनुभव आणि लैंगिक समानता यासारख्या इतर पैलूंसह सर्व मानकांवर चांगली कामगिरी केली आहे.
विप्रो लिमिटेडच्या या यशाबद्दल कंपनीच्या चीफ कल्चर ऑफिसर सुनीता रेबेका चेरियन न (Sunita Rebecca Cherian) यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, "आम्हाला आमच्या वैविध्यपूर्ण (Diverse) आणि सर्वसमावेशक कार्यबलाचा (Inclusive Workforce) खूप अभिमान आहे. आमची मजबूत एकता हीच आमच्या यशाचे मूळ आहे, भारतातील महिलांसाठी 2022 च्या सर्वोत्कृष्ट कार्यस्थळांमध्ये (India's Best Workplaces for Women 2022) शीर्षस्थानी असणे ही चांगली कामगिरी आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे मिळालेल्या यशाचा दाखला आहे."
दरम्यान, Best Workplaces for Women 2022 च्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी नाही, तर आणखी अनेक नावे समाविष्ट आहेत. रिपोर्टनुसार, विप्रो व्यतिरिक्त भारतात शिव नाडर स्कूल (Shiv Nadar School), डेलॉइट इंडिया (Deloitte India), सिस्को सिस्टम्स (Cisco Systems), टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications) आणि इन्फोसिस (Infosys) सुद्धा महिला कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम जागा आहे.