नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर असून, केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, यातही टेक महिंद्रा कंपनीने पुढाकार घेत आपल्या कॅफेटेरियाचे रुपांतर कोरोना केअर सेंटरमध्ये केले असून, ४० बेड्स उपलब्ध झाले आहेत. (tech mahindra converted cafeteria into 40 beds corona care center)
टेक महिंद्रा ही महिंद्रा समूहातील आयटी कंपनी आहे. कंपनीच्या कॅफेटेरियाचे ४० खाटांची क्षमता असलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. फोर्टिसच्या सहकार्याने कंपनी हा उपक्रम राबवत आहे. टेक महिंद्राने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून टेक महिंद्राच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Surround yourself with self-motivated & energetic people & your work will be unfailingly rewarding. The TechMighties are unstoppable & inspiring. They need no encouragement to #RiseForGood They and all my colleagues in @MahindraRise are my #MondayMotivationhttps://t.co/w2lTxGlrmQ
— anand mahindra (@anandmahindra) May 3, 2021
आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेल्या लोकांसोबत असणे आवश्यक आहे. तर, तुमच्या कामातून चांगला मार्ग निघतो. आयटी क्षेत्रात काम करणारे कधी थांबत नसतात. ते दुसऱ्याना देखील प्रेरित करतात. चांगल्या कामासाठी कोणाच्या प्रोत्साहनाची आवश्यकता नाही, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे.
मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर
कोरोनावर होणार उपचार
टेक महिंद्राच्या कॅफेटेरियामध्ये ४० खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी ३५ बेडवर रुग्ण दाखल झाले आहेत. २४ एप्रिलपासून या ठिकाणी हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर तात्पुरत्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. सुरुवातीला ही सुविधा टेक महिंद्राच्या कर्मचारी आणि नातेवाईकांसाठी सुरु करण्यात आली होती.
मारुतीचे अनेक प्रकल्प तात्पुरते बंद; आता कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार
अन्य रुग्णांना मदतीचा हात
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अन्य रुग्णांनी जेव्हा मदत मागितली, तेव्हा त्यांनाही याठिकाणी भरती करून घेण्यात आले. कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षाप्रमाणे या ठिकाणी सुविधा आहेत. फोर्टिसचे डॉक्टर फोन कॉलवर उपलब्ध आहेत तसेच ऑक्सिजन सुविधाही आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.