नवी दिल्ली : टेक महिंद्रा २०२१ पर्यंत आपल्या २५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देणार आहे. कंपनीचे सीएफओ मनोज भट यांनी ही माहिती दिली.
भट यांनी सांगितले की, लॉकडाऊन पूर्णत: उठल्यानंतरही टेक महिंद्राचे २५ ते ३० टक्के कर्मचारी घरूनच काम करतील. त्यासाठी कंपनीच्या धोरणात बदल करण्यात येईल. सुविधा बदलल्या जातील. नव्या गुणवत्तेला आकर्षित करण्यासाठी नवीन व्यवसाय मॉडेल विकसित करण्यात येईल. पुढील चार तिमाहींत हे बदल करण्याची टेक महिंद्राची योजना आहे. पुढील वर्षी मार्च अथवा जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. भट यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कामाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला. कोणत्याही जोखम ेशिवाय दीर्घकाळपर्यंत घरून काम करता येईल, अशी क्षेत्रे कोणती याचा शोध घेतला. त्यातून असे आढळून आले की, साधारणत: २५ ते ३० टक्के लोकांना कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिली जाऊ शकते.