Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mahindra New Jobs: महिंद्रांना मानलं बुवा! २० हजार नव्या नोकऱ्यांची घोषणा, सध्या कंपनीत १.६४ लाख लोक करताहेत काम

Mahindra New Jobs: महिंद्रांना मानलं बुवा! २० हजार नव्या नोकऱ्यांची घोषणा, सध्या कंपनीत १.६४ लाख लोक करताहेत काम

जागतिक मंदीचा वाढता धोका लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या एका बाजूला कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत आहेत. तर दुसरीकडे भारतीय कंपन्यांमध्ये मात्र जोरदार भरतीची तयारी सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 02:37 PM2022-11-03T14:37:42+5:302022-11-03T14:38:57+5:30

जागतिक मंदीचा वाढता धोका लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या एका बाजूला कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत आहेत. तर दुसरीकडे भारतीय कंपन्यांमध्ये मात्र जोरदार भरतीची तयारी सुरू आहे.

tech mahindra will add 20000 more people in next 12 months says ceo cp gurnani | Mahindra New Jobs: महिंद्रांना मानलं बुवा! २० हजार नव्या नोकऱ्यांची घोषणा, सध्या कंपनीत १.६४ लाख लोक करताहेत काम

Mahindra New Jobs: महिंद्रांना मानलं बुवा! २० हजार नव्या नोकऱ्यांची घोषणा, सध्या कंपनीत १.६४ लाख लोक करताहेत काम

नवी दिल्ली-

जागतिक मंदीचा वाढता धोका लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या एका बाजूला कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत आहेत. तर दुसरीकडे भारतीय कंपन्यांमध्ये मात्र जोरदार भरतीची तयारी सुरू आहे. टाटा समूह ४५ हजार नवे कर्मचारी भरतीची तयारी करत आहे तर महिंद्रा समूह देखील आता मागे राहिलेला नाही. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी येत्या काळात आपल्या मनुष्यबळात २० हजार कर्मचाऱ्यांची वाढ करण्याचा प्लान करत आहे. 

एका वर्षात होणार नवी भर्ती
टेक सेक्टरमध्ये अनेक बड्या कंपन्यांमध्ये मंदीच्या जोखमीचा परिणाम पाहायला मिळत आहे. बिजनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत महिंद्रा समूहातील टेक महिंद्रा कंपनीचे सीईओ सीपी गुरनानी यांनी येत्या वर्षभरात कंपनीत २० हजार नव्या लोकांना जोडणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या आमच्याकडे १ लाख ६४ हजार लोक काम करत आहेत. आता येत्या १२ महिन्यात हा आकडा १,८४,००० इतका होईल, असंही ते म्हणाले. 

सप्टेंबर महिन्यात दिला इतका रोजगार
टेक महिंद्रा कंपनीकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार कंपनीत सप्टेंबर महिन्यात ५,८७७ नव्या कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली. हाच आकडा जूनच्या तिमाहीमध्ये ६,८६२ इतका होता. रिपोर्टनुसार, कंपनीत सध्या एकूण १,६३,९१२ कर्मचारी कार्यरत आहेत. 

कंपनीत नोकरी सोडण्याचा दरही घटला
रिपोर्टानुसार जिथं इतर सेक्टरमध्ये अन्य कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा दर वाढत असातना टेक महिंद्रा कंपनीत मात्र वर्षागणिक हाच दर कमी होत आहे. कंपनीत नोकरी सोडण्याचा दर गेल्या तिमाहीमध्ये २२ टक्के इतका होता. त्यात घट होऊन आता तो २० टक्क्यांवर आला आहे. आम्ही भविष्य, स्किल डेव्हलपमेंट आणि ग्लोबल डिलिव्हरी मॉडलवर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि याच पद्धतीची रणनिती तयार केली जाणार आहे, असंही कंपनीच्या सीईओंनी सांगितलं. 

टेक महिंद्राच्या नेट प्रॉफिटमध्ये घट
Tech Mahindra कंपनीला दुसऱ्या तिमाहीत नेट प्रॉफिटमध्ये किरकोळ नुकसान सोसावं लागलं आहे. टेक महिंद्राचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर ४ टक्क्यांनी घसरला आहे. या तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल १३,१२९.५ कोटी रुपये होता, जो अनुक्रमे ३.३ टक्के आणि वर्षभरात २०.६ टक्क्यांनी वाढला आहे.

Web Title: tech mahindra will add 20000 more people in next 12 months says ceo cp gurnani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.