Join us  

MCX वर तांत्रिक बिघाड, कमोडिटी ट्रेडिंग झालेलं ठप्प; वाचा कधी सुरू झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 10:42 AM

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियावर (MCX) कमॉडिटी ट्रेडिंग आज म्हणजेच मंगळवारी सकाळी ९ ऐवजी १० वाजता सुरू झालं.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियावर (MCX) कमॉडिटी ट्रेडिंग आज म्हणजेच मंगळवारी सकाळी ९ ऐवजी १० वाजता सुरू झालं. काही तांत्रिक अडचणींमुळे ट्रेडिंग वेळेवर सुरू झालं नव्हतं. एमसीएक्सच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या निवेदनात एंड ऑफ द डे प्रोसेसमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे कालच्या ट्रेडिंगला उशीर झाला. यासाठी विशेष सत्र सकाळी ९.४५ वाजता सुरु होईल आणि बाजार सकळी १० वाजता सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं.

एमसीएक्स हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी एक्सचेंज असून एमसीएक्सवरील दैनंदिन कमोडिटी ट्रेडिंग सत्र सकाळी ९ वाजता सुरू होते आणि ११.३० वाजता संपते. सकाळचं सत्र संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असते आणि संध्याकाळचं सत्र ५ वाजता सुरू होते. एमसीएक्सवर अॅग्री कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, तर बुलियन, मेटल आणि अन्य एनर्जी फ्युचर्स ट्रेड रात्री ११.३० वाजेपर्यंत होतात. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, एमसीएक्सला या वर्षाच्या सुरुवातीला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला होता.

एमसीएक्सवर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग नेहमीच्या ट्रेडिंग तासांऐवजी दुपारी १ वाजता उशीरा सुरू झाले होते. सकाळी ९.२० वाजता एमसीएक्सचा शेअर बीएसईवर ०.३५ टक्क्यांनी घसरून ३,९३३३.७५ रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान, आज कामकाजादरम्यान एमसीएक्सच्या शेअरमध्ये ०.४३ टक्क्यांची वाढ होऊन तो ३,९६४ रुपयांवर पोहोचला होता.

टॅग्स :शेअर बाजार