मुंबई- तंत्रज्ञानाने घडवलेल्या आमूलाग्र बदलांमुळे येणारा काळ महत्त्वाचा असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या ‘रिइन्व्हेंट २०१७’ या जागतिक परिषदेत उद्योजक, शास्रज्ञ व जागतिक स्तरावरील वक्ते यांनी एकाच मंचावर येऊ न भविष्यातील तंत्रज्ञानावर विस्तृत प्रकाश टाकला. न्यूयॉर्क येथील रॉचेस्टॉन या संस्थेने परिषद आयोजित केली होती.
या परिषदेत हवाई क्षेत्र, स्मार्ट सिटी, कृषी, स्वयंचलीकरण, व्यावसाय सक्षमता, शिक्षण, प्रशासन, टेलिकॉम या क्षेत्रांवर आयओटी आणि बिग डेटा प्रणालीच्या होणा-या परिणामांवर विचार करण्यात आला. प्रमाणपत्र कार्यशाळा, राऊंडटेबल चर्चा यांचा यांत समावेश होता.
रॉचेस्टॉन एलएलसीचे अध्यक्ष हाजा मोहिदीन यांनी सांगितले की, आपण आता तंत्रज्ञानाच्या जवळपास शिखरावर पोहोचलो आहोत आणि आयओटीचा विस्तार होतच जाणार. या गोष्टींची केवळ अंतर्गत जोडणी बाकी असेल. आयओटी व यंत्रशिक्षण तंत्रज्ञानानावरील व्यावसायिक आस्थापने आधुनिक अर्थव्यवस्थेचा गाडा चालवित आहेत. या परिषदेत विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘रिइन्व्हेंट २०१७’मध्ये तंत्रज्ञानाचा लेखाजोखा, तंत्रज्ञानावर विस्तृत प्रकाश
जागतिक परिषदेत उद्योजक, शास्रज्ञ व जागतिक स्तरावरील वक्ते यांनी एकाच मंचावर येऊ न भविष्यातील तंत्रज्ञानावर विस्तृत प्रकाश टाकला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:03 AM2017-11-21T00:03:08+5:302017-11-21T00:03:25+5:30