Join us

वस्त्रोद्योगासाठी ‘टेकटेक्स्टील’, उद्यापासून मुंबईत प्रदर्शन; अनेक कंपन्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:53 AM

भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन, सहाव्या ‘टेकटेक्स्टील इंडिया’ हे प्रदर्शन १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात मुंबईत होत आहे. रिलायन्स इंडस्ट्री, वेलस्पन, ग्रोझबर्टर्ट, गरवारे वॉल रॉप, खोसला प्रोफील, लुवा इंडिया, लेन्झिंग एजी, सीएचटी इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यात सहभागी होणार आहेत.

मुंबई : भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन, सहाव्या ‘टेकटेक्स्टील इंडिया’ हे प्रदर्शन १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात मुंबईत होत आहे. रिलायन्स इंडस्ट्री, वेलस्पन, ग्रोझबर्टर्ट, गरवारे वॉल रॉप, खोसला प्रोफील, लुवा इंडिया, लेन्झिंग एजी, सीएचटी इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यात सहभागी होणार आहेत.या वर्षीच्या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, ‘टेकटेक्स्टील इंडिया २०१७’ व ‘तेलंगण वस्त्रोद्योग मंत्रालय’ यांच्यात करार झाला आहे. तेलंगण सरकार आपल्या राज्यातील खरेदीदार व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, या व्यापार मेळाव्यातील वस्त्रोद्योग धोरणांचा प्रचार करतील आणि यामुळे गुंतवणुकीची शक्यता वाढू शकेल, अशी माहिती येथे देण्यात आली. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.या प्रदर्शनामुळे कापड उत्पादक व वस्त्रोद्योग प्रक्रियेतील तंत्रज्ञान, तसेच संबंधित सेवा यांच्यात एक सेतू बांधला जाईल. मेसे फ्रँकफर्ट एशिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक राज माणेक यांनी ही माहिती देताना सांगितले की, टेक्सप्रोसेस पॅव्हेलियनचे लाँचिंग सर्व वस्त्रोद्योगांना नावीन्यपूर्ण असून, आपला ग्राहक बेस मजबूत करण्यासाठी तो व्यासपीठ मिळवून देईल. अलीकडील अभ्यासानुसार, नॉनवुवन (न विणलेले कापड) क्षेत्र भारतातील गुंतवणुकीसाठी पसंतीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते.वस्त्र उद्योगातील एकूण उत्पादनातील ९ टक्के खप भारतात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक कंपन्या यात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने एका परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :भारत