Join us

अवघ्या 35 दिवसांत होईल मोठी कमाई; कमी भांडवलात बटेर पालन व्यवसाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 2:53 PM

bater palan : बटेर पालनातून शेतकरी केवळ 30 ते 35 दिवसांत चांगला नफा मिळवू शकतात.

नवी दिल्ली : भारताच्या ग्रामीण भागात कमी किमतीत जास्त फायदेशीर व्यवसाय खूप लोकप्रिय होत आहेत. बटेर पालन हा देखील असाच एक व्यवसाय आहे. कोंबडीपालनासाठी (Poultry Farming))लागणाऱ्या भांडवलापेक्षा कमी भांडवलात बटेर पालन व्यवसाय सुरू करता येतो. दरम्यान, बटेर पालनातून शेतकरी केवळ 30 ते 35 दिवसांत चांगला नफा मिळवू शकतात.

कोंबडीपालनापेक्षा बटेर पालन हा खूप स्वस्त व्यवसाय आहे. कोंबड्यांच्या देखभालीसाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. परंतु लहान बटेर पालन करण्यात इतकी जास्त मेहनत करण्याची गरज नाही. लहान आकार आणि कमी वजनामुळे खाद्य आणि जागेची आवश्यकता देखील कमी आहे. व्यवसायात गुंतवणूक देखील खूप कमी आहे. मात्र, शिकारीमुळे लहान पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत दक्षता घेत सरकारने बटेर पालनाबाबत नियम लागू केला आहे. ज्या व्यक्तीला बटेर पालन करायचे असेल, त्याला यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागेल.

तुम्ही फक्त 50 हजार खर्चात बटेर पालन व्यवसाय सुरू करू शकता. 50 हजार खर्च करून 1000 बटेरचे फार्म करता येते. यातून दरमहा 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. दरम्यान, तुम्ही जितकील बटेरची संख्या वाढवाल तितका तुमचा नफा वाढेल. मादी बटेरमध्ये एका वर्षात 300 अंडी घालण्याची क्षमता असते. बहुतेक तीतर त्यांच्या जन्मानंतर 45 ते 50 दिवसांत अंडी घालू लागतात. 

बटेर पक्ष्यांच्या शरीरावरील पिसाचा रंग तपकिरी असून, त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. नर पक्ष्याच्या छातीच्या वरच्या भागावर तपकिरी रंगाची पिसे व त्यावर काळपट रंगाचे ठिपके असतात. यावरून तिसऱ्या आठवड्यात नर व मादीतील फरक सहज ओळखता येतो. दरम्यान, बाजारात बटेरच्या मांसाला चांगली मागणी आहे. 30 ते 35 दिवसांत बटेर 180 ते 200 ग्रॅम होतात. अशा स्थितीत ते बाजारात विकले जातात. एक बटेर 50 ते 60 रुपयांना सहज विकला जातो. बटेर तितराचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केल्यास तुम्हाला वर्षाला लाखोंचा नफा मिळू शकतो.

टॅग्स :व्यवसायशेतकरी