Tega Industries IPO: गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारात कमाईसाठी आणखी एक संधी आली आहे. Tega Industries चा आयपीओ आज म्हणजेच १ जिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. तसंच हा आयपीओ ३ डिसेंबरपर्यंत खुला राहिल. आयपीओ खुला झाल्यापासूनच शेअर बाजाराच याचा डंका वाजण्यास सुरूवात झालीये. कंपनीचा अनलिस्टेड शेअर ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रीमिअमवर ट्रेंड करत आहे.
सध्या टेगा इंडस्ट्रीजचा ८५.१७ टक्के हिस्सा प्रमोटर्सकडे आहे. तर दुसरीकडे अमेरिकेची पीई फर्म TA Associates ची सहकारी कंपनी Wagner कडे कंपनीचा १४.५४ टक्के हिस्सा आहे. आयपीओअंतर्गत प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्सकडून एकूण १,३६,६९,४७८ शेअर्सची विक्री केली जाईल. प्रमोटर मदन मोहन मोहनका ३३.१४ लाख इक्विटी शेअर्स आणि मनिष मोहनका ६.६३ लाख शेअर्सची विक्री करतील. तर Wagner जवळपास ९६.९२ लाख इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहे.
GMP मध्ये सातत्यानं वाढ
जाणकारांनुसार टेगा इंडस्ट्रीजचा ग्रे मार्केट प्रीमिअम सातत्यानं वाढत आहे. यावरून गुंतवणूकदार यात रस दाखवत असल्याचंही दिसून येत आहे. सध्या याचा ग्रे मार्केट प्रीमिअम ३७८ रूपये इतका सुरू आहे. हा इश्यू प्राईजपेक्षा तब्बल ८० टक्के अधिक आहे. रेव्हेन्यूच्या आधारावर सांगायचं झाल्यास टेगा इंडस्ट्रीज पॉलिमर आधारित मिल लायनर्स तयारप करणारी देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. स्वीडनच्या एका कंपनीच्या सहकार्यानं १९७८ मध्ये या कंपनीची स्थापना केली. २००१ मध्ये प्रमोटर मदन मोहन मोहनका यांनी स्वीडिश कंपनीकडून पूर्ण हिस्सा खरेदी केला होता.
काय आहे प्राईज बँड?
टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओचा प्राईज बँड ४४३ ते ४५३ रूपयांच्या दरम्यान आहे. हा आय़पीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. याअंतर्गत प्रमोटर आपला हिस्सा विकून पैसे जमवण्याच्या तयारीत आहेत. कंपनी आयपीओअंतर्गत कोणतेही नवे इक्विटी शेअर्स जारी करणार नाही. एका लॉटमध्ये ३३ शेअर्स असतील. तसंच यासाठी किंमान १४,९४९ रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर तुम्ही १,९४,३३७ रूपयांची कमाल गुंतवणूक करू शकता.