Join us

भारतीय अर्थव्यवस्थेतील मरगळ तात्पुरती, जागतिक बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 4:10 AM

जीएसटीवरून मोदी सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत असताना, जागतिक बँकेने मात्र जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.

नवी दिल्ली : जीएसटीवरून मोदी सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत असताना, जागतिक बँकेने मात्र जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक असून, जीएसटीचे हे तात्पुरते परिणाम आहेत. येत्या काही महिन्यांत ही मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.जीएसटी लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम म्हणाले. जीएसटीनंतरच्या तीन महिन्यांत अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचे जे पाहायला मिळाले आहे, त्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहू नका. हे चित्र बदलेल. आर्थिक आलेख उंचावेल, असा विश्वासही किम यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व्यापाराला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच फळ येईल, असेही त्यांनी सांगितले. विदेशी गुंतवणूक भारतात यावी, यासाठीही प्रयत्न होत आहेत. पण निरक्षरता व आरोग्यविषयक आव्हानांना भारत तोंड देत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

टॅग्स :बँकजीएसटी