Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘अमेरिका-चीन यांच्यातील तणाव जगासाठी घातक’

‘अमेरिका-चीन यांच्यातील तणाव जगासाठी घातक’

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्र्रिस्टिन लगार्ड यांनी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:56 AM2019-05-09T03:56:32+5:302019-05-09T04:00:21+5:30

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्र्रिस्टिन लगार्ड यांनी केले आहे.

 'Tensions between US-China are dangerous for the world' | ‘अमेरिका-चीन यांच्यातील तणाव जगासाठी घातक’

‘अमेरिका-चीन यांच्यातील तणाव जगासाठी घातक’

पॅरिस : अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्र्रिस्टिन लगार्ड यांनी केले आहे.
पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनात लगार्ड यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे, हे स्पष्टच दिसून येत आहे. अफवा आणि टष्ट्वीट संदेश यामुळे दोन्ही देशांत कोणत्याही प्रकारे व्यापारी समझोता होण्याची शक्यता कमी झाली आहे.
या कार्यक्रमात फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ले मायरे यांनीही अशीच चिंता व्यक्त करणारे भाषण केले.

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांतील संघर्षाबाबत इशारा दिला. मायरे यांनी म्हटले की, आम्ही चीन आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या वाटाघाटींवर नजर ठेवून आहोत. दोन्ही देशांनी पारदर्शकता आणि बहुपक्षवादाच्या सिद्धांताचा सन्मान करायला हवा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर नकारात्मक परिणाम होईल, असे निर्णय घेण्यापासून दोन्ही देशांनी दूर राहायला हवे.
अमेरिकेने चीनवर आणखी आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन्ही देशांत पुन्हा व्यापार युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनचे एक शिष्टमंडळ बुधवारी वॉशिंग्टनला जाणार आहे. तथापि, त्याआधीच अमेरिकेने आयात शुल्कवाढीची घोषणा केली आहे. आपले शिष्टमंडळ अमेरिकेला जाईल, असे चीनने म्हटले असले तरी दोन्ही देशांत तणाव कायम असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.
 

Web Title:  'Tensions between US-China are dangerous for the world'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.