Lokmat Money > बिझनेस न्यूज > Elon Musk यांनी व्यक्त केली जॉब सोडण्याची इच्छा; जाणून घ्या, काय आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा पुढचा प्लॅन

Elon Musk यांनी व्यक्त केली जॉब सोडण्याची इच्छा; जाणून घ्या, काय आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा पुढचा प्लॅन

मस्क यांच्या ट्विटवर अनेक युझर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने त्यांना यूट्यूब चॅनल सुरू करण्याचेही सुचविले आहे. टेस्लाचे सीईओ मस्क, हे सोशल मीडियावरील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक आहेत आणि असे असतानाच त्यांचे हे ट्विट आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:00 PM2021-12-10T13:00:04+5:302021-12-10T13:02:06+5:30

मस्क यांच्या ट्विटवर अनेक युझर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने त्यांना यूट्यूब चॅनल सुरू करण्याचेही सुचविले आहे. टेस्लाचे सीईओ मस्क, हे सोशल मीडियावरील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक आहेत आणि असे असतानाच त्यांचे हे ट्विट आले आहे.

Tesla CEO Elon Musk says thinking of quitting my jobs & becoming an influencer full time | Elon Musk यांनी व्यक्त केली जॉब सोडण्याची इच्छा; जाणून घ्या, काय आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा पुढचा प्लॅन

Elon Musk यांनी व्यक्त केली जॉब सोडण्याची इच्छा; जाणून घ्या, काय आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा पुढचा प्लॅन

नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी म्हटले आहे, की ते नोकरी सोडून इनफ्लुएन्सर बनण्याचा विचार करत आहे. मस्क हे टेस्लातील आपला वाटा सातत्याने कमी करत आहेत. त्यांनी गुरुवारी कंपनीचे 934,091 शेअर्स 96.3 कोटी डॉलर मध्ये विकले. 10 टक्के समभाग विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी साठ लाख शेअर्स विकावे लागतील.

मस्क यांनी केले असे ट्विट -  
मस्क यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मी माझे काम सोडण्याचा आणि फुल टाइम इनफ्लुएन्सर होण्याचा विचार करत आहे. याच बरोबर त्यांनी लोकांकडून त्यांची मतेही मागवली आहेत.

मस्क यांच्या ट्विटवर अनेक युझर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने त्यांना यूट्यूब चॅनल सुरू करण्याचेही सुचविले आहे. टेस्लाचे सीईओ मस्क, हे सोशल मीडियावरील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक आहेत आणि असे असतानाच त्यांचे हे ट्विट आले आहे.

हुकूमशहा किम जोंग उनसोबत होतेय तुलना -
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क, हे आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी ते त्यांच्या नव्या हेअरकटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या या हेअरकटमुळे त्यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनशीही केली जात आहे. विशेष म्हणजे, मस्क यांनी आपण स्वतःच केस कापल्याचे म्हटले आहे. यावर सोशल मीडियावर अनेक फनी मीम्स बनत आहेत.

हेही वाचा - 

माझे शब्द लिहून ठेवा, मानवी सभ्यता नष्ट होणार...; एलन मस्क यांचा दावा, पण जगाला का घाबरवलं?

Web Title: Tesla CEO Elon Musk says thinking of quitting my jobs & becoming an influencer full time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.