Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका ट्विटमुळे 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढली टेस्लाच्या सीईओंची संपत्ती

एका ट्विटमुळे 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढली टेस्लाच्या सीईओंची संपत्ती

सोशल मीडिया हा सध्याच्या सार्वजनिक जीवनाच्या अविभाज्य भाग बनला आहे. काही सेलेब्रिटींना सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून आर्थिक कमाई होत असल्याचेही तुम्ही वाचलं असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 03:53 PM2018-08-08T15:53:29+5:302018-08-08T16:14:07+5:30

सोशल मीडिया हा सध्याच्या सार्वजनिक जीवनाच्या अविभाज्य भाग बनला आहे. काही सेलेब्रिटींना सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून आर्थिक कमाई होत असल्याचेही तुम्ही वाचलं असेल.

Tesla CEO's assets increased by 9,600 crores due to a tweet | एका ट्विटमुळे 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढली टेस्लाच्या सीईओंची संपत्ती

एका ट्विटमुळे 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढली टेस्लाच्या सीईओंची संपत्ती

सॅन फ्रान्सिस्को - सोशल मीडिया हा सध्याच्या सार्वजनिक जीवनाच्या अविभाज्य भाग बनला आहे. काही सेलेब्रिटींना सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून आर्थिक कमाई होत असल्याचेही तुम्ही वाचलं असेल. पण एका ट्विटमुळे टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांची संपत्ती तब्बल 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. 

त्याचे झाले असे की, टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांनी मंगळवारी ट्विटर वरून एक मोठी घोषणा केली होती. "आपण टेस्ला कंपनी वॉल स्ट्रीटमधून बाहेर काढून प्रायव्हेट  कंपनी बनवण्याचा विचार करत आहोत. तसेच कंपनीच्या भागधारकांकडून 420 डॉलर (28 हजार 800 रुपये) प्रति शेअर दराने समभाग परत खरेदी केले जातील," अशी घोषणा करणारे ट्विट मस्क यांनी केले. 

या ट्विटनंतर टेस्लाच्या शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले. तसेच शेअरची किंमत 11 टक्क्यांनी वाढून 379.57 डॉलर एवढी झाली. शेअरची किंमत वधारल्याने मस्क यांच्या संपत्तीमध्येही 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 47 वर्षीय मस्क हे टेस्लामधील सर्वात मोठे भागधारक असून, ते जगातील 31 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.  

आता जर मस्क यांनी आपल्या योजनेनुसार इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी असलेल्या टेस्ला हिला सार्वजनिक कंपनीमधून प्रायव्हेट कंपनी बनवले तर हा अशा प्रकारचा सर्वात मोठा व्यवहार असेल. तसेच 420 डॉलर प्रति शेअर च्या हिशोबाने हा व्यवहार 72 अब्ज डॉलरचा (सुमारे 49 हजार कोटी रुपये) असेल. 
 

Web Title: Tesla CEO's assets increased by 9,600 crores due to a tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.