एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारची जगभरात क्रेझ आहे. त्यांची इलेक्ट्रिक कार भारतात कधी दाखल होते याची अनेकांना प्रतीक्षा आहे. पण ही कार भारतात लॉन्च करण्यात अडथळे असून, या कारवर लावण्यात येणाऱ्या सुल्कात सवलत मिळावी, यासाठी टेस्ला भारतापुढे हात पसरत आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेले एलॉन मस्क यांची कंपनी सबसिडीसाठी थांबली हे बघून या क्षेत्रातील तज्ञ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
का पसरले हात?
भारतात विदेशी ई-कार आयात करण्यावर ६० ते १०० टक्के आयात शुल्क लावण्यात येते. या शुल्कानंतर टेस्लाची ३० लाखांची कार भारतात ४८ लाखापर्यंत मिळेल. एवढी महाग कार कोणी घेणार नाही, याची भीती असल्याने टेस्लाला सबसिडी हवी आहे.
सबसिडी मिळाली नाही तर...?
सध्याच्या आयात शुल्काच्या दरानुसार टेस्लाच्या अनेक कार महाग मिळतील.
कधी सुरू होऊ शकते विक्री?
पुढच्या वर्षी जूननंतर टेस्लाची कार भारतात उपलब्ध होऊ शकते. मात्र, त्यासाठी एलॉन मस्क यांची सबसिडीची मागणी एकतर पूर्ण व्हावी लागेल किंवा त्यांना ती मागे तरी घ्यावी लागेल.